Press "Enter" to skip to content

कर्जत तालुक्यातील शक्तीपीठ

कर्जत शहराच्या टेकडीवरील श्री वेदमाता

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

कर्जत शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी टेकडीवर आहे या टेकडीवर श्री वेदमातेचे मंदीर आहे, नवरात्रीत नऊ दिवस मंदीरात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होतात.

वारकरी सांप्रदाय परंपरा लाभलेले, वारकरी शिक्षण संस्था श्री क्षेत्र आळंदीचे मुख्य प्रवर्तक, ज्ञानेश्वरीकार आणि किर्तनकार गुरुवर्य वै. ह. भ. प. मामासाहेब दांडेकर यांचे परम शिष्यत्व लाभलेले सद्गुरु वै. ह.भ.प. योगीराज श्रीमान गजानन महाराज अटक यांनी श्री क्षेत्र आळंदी येथे वारकरी शिक्षण संस्थेत तीन वर्षाचा अभ्यासक्रम पुर्ण करुन गुरु आज्ञेने कर्जत परिसरात जगत कल्याणाचे कार्य करणेकरिता नियुक्ती केली. अध्यात्म ज्ञान, भक्ती मार्ग, नामस्मरण, प्राणायाम, ध्यान साधना आदी ज्ञानदानाचे कार्य सुरु केले, हे कार्य त्यांनी मुद्रे येथुन सुरु केले.दामु बैलमारे हे अतिशय पिशाच्च बाधाने पिडीत होते, यावर काहीतरी उपाय व्हावा म्हणुन महारांजाना विनंती केल्याने त्यांनी श्री गुरु चरित्र ग्रंथाचे पारायण करण्याचे प्रायोजन करुन दामु बैलमारे यांना पिशाच्च बाधा मुक्त केले. या कामी त्यांनी भोवतालच्या देव देवतांच्या स्थानाचा विचार करता या देवी स्थानाची ओळख झाली.

ओळख करुन देताना श्रीमान अटक महाराज म्हणाले हे स्थान अतिशय महत्वाचे आहे, संपुर्ण विश्वाची विश्व शक्ती देवता आई वेदमाता आहे, हिला कोणी अन्नपुर्णा देवी तर कोणी आदिमाया शक्ती, तर कोणी मरिआई म्हणतात हिची स्थापना छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरु संतश्रेष्ठ रामदास स्वामीनी स्थापन केलेले हे पुरातन स्थान जागृतस्थान आहे, दोन हात जोडुन माथा टेकवून नमस्कार आणि शुध्द भावाची आवश्यकता आहे, देवी प्रसन्न होवून भक्त गणांची मनोकामना पुर्ण करणारी देवता आहे.

मुद्रे ग्रामस्थ व कर्जत परिसरात हे स्थान माथ्यावरील देव म्हणुन फार पुर्वीपासुन प्रख्यात होते, हे पुरातन स्थान असुन या ठिकाणी मुद्रे ग्रामदेवता म्हणुन प्रत्येक शुभकार्यात नारळ, विडा, अगरबत्ती ने पुजा केली जाते ही परंपरा आजपर्यत सुरु आहे.श्रीमान गजानन महाराज अटक यांनी ओळख करुन दिली तो दिवस माहे मे 1988 वैशाख कृ -3 संकष्टी चर्तुथी या दिवसापासुन वैष्णव संस्कार केंद्राचे सेवक व मुद्रे ग्रामस्थ यांचेवतीने एक दिवस ज्ञानयज्ञ सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करतात, त्याच बरोबर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.