Press "Enter" to skip to content

“त्या”आरोपींना कठोर शासन झाले पाहिजे:- प्रवीण दरेकर

रोहा बलात्कार पीडित मुलीच्या कुटुंबियांची विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी घेतली भेट

सिटी बेल लाइव्ह / रायगड: (धम्मशिल सावंत)

रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील तांबडी गावातील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेमुळे रोहा तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. या गंभीर घटनेची विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी दखल घेतली असून आज मंगळवार २८ जुलै रोजी ते रोहाच्या दौ-यावर आले असून त्यांनी त्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह सापडला त्या ठिकाणी भेट दिली आहे.

रोहा तालुक्यातील तांबडी येथे एका १४ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची निघृण हत्या केल्याची खळबळजनक घटना घडल्यानंतर विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज सकाळी त्या घटनास्थळी भेट दिली. तसेच त्या दुदैर्वी मुलीच्या कुटुंबियांची घरी जाऊन भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले.

“आरोपींना कठोर शासन झाले पाहिजे. या प्रकरणाचा तपास योग्य पध्दतीने करण्यात यावा व यामध्ये कुठलीही त्रुटी राहता कामा नये ” अशा सूचना विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी पेलिस यंत्रणांना दिल्या. याप्रसंगी माजी मंत्री रविंद्र चव्हाण, भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ, माधवी नाईक, महेश मोहिते आदी उपस्थित होते.

पोलिसांच्या माहितीनुसार, रविवारी संध्याकाळपासून ही अल्पवयीन मुलगी बेपत्ता होती. त्यामुळे कुटुंबीयांकडून तिचा शोध सुरु होता. अखेर रात्री उशीरा गावाबाहेर या मुलीचा मृतदेह सापडला. यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली.पोलिसांच्या अंदाजानुसार,रविवारी संध्याकाळी साधारण साडेसात ते आठच्या सुमारास तांबडी परिसरातील एका फार्महाऊसवर नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आले. यानंतर नराधमांनी तिचा खून करुन तिचा मृतदेह गावाच्या बाहेर टाकून पळ काढला.

राज्यामध्ये सातत्याने महिलांवरील अत्याचार, विनयभंग, बलात्काराच्या घटना वाढत आहे. तरीही या महाविकास आघाडीच्या संवेदना गोठलेल्या आहेत. कारण राज्यात अश्या घटना रोज घडत असताना सरकारला मात्र अशा गंभीर घटनांची नोंद घ्यावीशी वाटत नाही. पोलिस प्रशासनावर सरकारचा कुठलाही वचक नाही व धाक राहिलेला नाही. त्यामुळे रोहा येथील प्रकरणातील गुन्हेगारांविरुध्द कठोर कारवाई करुन हा खटला जलदगतीने चालवून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज केली.
रोहा तालुक्यातील तांबडी येथे एका १४ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची निघृण हत्या केल्याची खळबळजनक घटना घडल्यानंतर विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज तातडीने सकाळी त्या घटनास्थळी भेट दिली. त्यांच्यासमवेत माजी मंत्री रविंद्र चव्हाण, भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ, माधवी नाईक, महेश मोहिते आदी उपस्थित होते.
यावेळी दरेकर यांनी सांगितले की, रोहामध्ये घडलेली ही घटना अतिशय हृदय हेलावणारी आहे. माणुसकीला काळीमा फासणारे असे कृत्य नराधामांनी केले आहे. एका निष्पाप मुलीवर नराधामांनी बलात्कार करुन तिची क्रूरपणे हत्या केली. राज्यामध्ये महिलांविरुध्द अशा भयंकर घटना रोज घडत असताना सरकार नावाची यंत्रणा गप्प बसली आहे, सरकारकडून कुठलेही भाष्य होत नाही. जनतेला आत्मविश्वास व धीर देण्याची आवश्यकता आहे. ग्रामीण भागातील मुली, महिला या घरापासून लांब शाळेत, शेतावर व बाजारकामासाठी बाहेर जात असतात पण आता या गंभीर परिस्थितीत वाडया वस्त्यांवरील आपल्या मुलींना तरुणींना, महिलांना घरातून बाहेर पाठावयाचे का…असा प्रश्न त्यांच्या आई वडिलांना पडला आहे. कारण राज्यामध्ये भयावह वातावरण निर्माण झाले आहे, त्यामुळे या गंभीर प्रकरणांची सरकारने दखल घ्यावी व या प्रकरणाचा तपास योग्य पध्दतीने करुन दोषींन कठोर शासन करण्यात यावे अशी मागणी करतानाच या प्रकरणात भाजपच्या वतीने चांगला वकील देण्यात येईल व मुलींच्या कुटुंबियांना न्याय मिळून देण्यात येईल असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.
रोहा येथील तांबडी तालुक्यातील त्या मुलीच्या घरी जाऊन त्यांच्या कुंटुंबियांची दरेकर यांनी भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले. या प्रकरणातील दोषींना शासन होईलच असे आश्वासन कुटुंबियांना देण्यात आले. मात्र या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांबद्दल कुटुंबियांच्या मनात शंका आहेत. कारण ती दुदैर्वी मुलगी खेळाडू होती. कबड्डी, कराटे खेळणारी होती, त्यामुळे तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला असावा असा अंदाज तिच्या कुटुंबियांनी व्यक्त केल्याची माहितीही दरेकर यांनी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना दिली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.