Press "Enter" to skip to content

केरुमाता बौद्ध लेण्यांच जतन करण्यासाठी प्रयत्नशील : रामदास आठवले

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली केरूमाता बौद्ध लेणीला भेट

सिटी बेल लाइव्ह / रायगड: धम्मशिल सावंत #

  • पनवेल जवळील उलवे पासून नजीक असणाऱ्या कोंबडभुजे वाघिवली वाडा येथील प्राचीन केरूमाता बौद्ध लेणीवर सिडको ने केलेल्या तोडक कारवाईमुळे बौद्ध जनतेत तीव्र संतापाची लाट असून त्या पार्श्वभूमीवर आज सोमवारी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले हे केरूमाता बौद्ध लेणी ला भेट दिली.
    केरुमाता बौद्ध लेण्यांच जतन व संवर्धन करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे ना.रामदास आठवले म्हणाले.
    केरुमाता बौद्ध लेणी वर सिडकोने पोलीस संरक्षण घेत कोरोना काळाचा गैर वापर करून 2000 वर्षापूर्वीचे अतिप्राचीन बौद्ध लेण्यांवर तोडणं कारवाई करत ते मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडून तेथे बौद्ध लेण्या नसल्याचा कांगावा करत त्या नेस्त नाबूत करत जगापासून लपविण्याचे कट कारस्थान केलेले आहे.. ह्या गोष्टीचा सर्व नवी मुंबईतील बौद्ध बांधवांनी कडकडून विरोध केला व एअरपोर्ट आस्थापणाने ह्या जागेवर बौद्ध लेण्यांचे संवर्धन करून त्याचे पुनर्वसन करावे व त्या साठी भारतीय पुरातत्व विभागाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन देत समाज बांधवांची मनोकामना पूर्ण करण्यार असे रामदास आठवले यांनी उपस्थित समाज बांधवांना भेटी दरम्यान शब्द दिला.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी येथील 10 गावांचे पुर्नवसन तसेच येथील केरूमाता बौद्ध लेणी चे पुनर्वसन करण्या करिता योग्य ते सहकार्य करणार असल्याने बौद्ध जनतेत समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर ना रामदास आठवले यांनी केरुमाता बौद्ध लेणी ला दिलेली भेट महत्वपूर्ण ठरणार आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.