Press "Enter" to skip to content

धक्कादायक ! संतापजनक घटना !

रोह्यात अल्पवयीन मुलीची बलात्कार करुन हत्या; रायगडात खळबळ

सिटी बेल लाइव्ह / रोहा / धम्मशिल सावंत – अमुलकुमार जैन – नारायण खुळे – विश्वास निकम #

रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील तांबडी येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याची धक्कादायक आणि संतापनजक घटना काल दि. (26 जुलै) सायंकाळी उशिरा उघडकीस आली आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सुरु करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी इंडिया बुल्स येथील विलगीकरणं कक्षात एका महिलेवर बलात्कार झाल्याची घटना घडली होती.अशाप्रकारची महिन्यातील ही दुसरी घटना आहे.

  • रोहा तांबडी येथील 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याची घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, रविवारी संध्याकाळपासून ही मुलगी बेपत्ता होती. त्यामुळे कुटुंबियांकडून तिचा शोध सुरु होता. सायंकाळी ताम्हणशेत येथील ओहळाजवळ या मुलीचा मृतदेह सापडला. याबाबतची माहिती रोहा पोलिसांना मिळताच त्यांची घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरा रोहा पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञातावर बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेनंतर पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ हे रोह्यात दाखल झाले आहेत. रोहा पोलिसांकडून आरोपींचा कसून शोध घेतला जात असून, या घटनेचा अधिक तपास रोह्याचे डिवायएसपी किरण कुमार सूर्यवंशी हे करीत आहेत.

दरम्यान, या घटनेबाबत रोह्यामधून तीव्र संताप व्यक्त केला जात असून, ही घटना समजताच रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी घटनास्थळी भेट देऊन हे कृत्य करणार्‍या नराधमाला लवकरात लवकर अटक करून कठोरात कठोर शिक्षा व्हावी असे आदेश रायगड पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांना देण्यात आले.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहचून घटनेच्या अनुषंगाने पंचनामा केला असून गुन्ह्याचा जलद छडा लावण्यासाठी आठ टीम तयार केल्या आहेत. लवकरच आरोपीच्या मुसक्या आवळल्या जातील. 
जिल्हा पोलिस अधीक्षक अनिल पारसकर

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.