Press "Enter" to skip to content

चिंचवली – गणेगाव येथील 152 ग्रामस्थांचे लसीकरण

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

शहरामध्ये नगरपरिषद प्रभागात लसीकरण शिबिराचे आयोजन करीत आहेत, आता ग्रामीण भागात ग्रामपंचायत आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे, कर्जत तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत नसरापूर मधील मौजे चिंचवली – गणेगाव येथील 152 ग्रामस्थांना कोविशिल्ड वॅक्सिंन चे डोस देण्यात आले.

ग्रुप ग्रामपंचायत नसरापूर कार्यालयात येथे हा उपक्रम राबविण्यात आला होता प्रथम अँटीजेन टेस्ट करण्यात आली ग्रुप ग्रामपंचायत नसरापूर सरपंच साक्षी संतोष मोहिते, युवासेना कर्जत तालुका सचिव तथा विद्यमान सदस्य अ‍ॅड.संपत हडप,समाजसेवक संतोष मोहिते यांनी सातत्याने पाठपुरावा करून हा उपक्रम ग्रामपंचायत नसरापूर हद्दीतील प्रत्येक गावात राबविण्यासाठी पुढाकार घेतला.

या शिबिरासाठी कडाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सहाय्यक विकास कटारे, आरोग्य सेवक एन. डी. पाटील, आरोग्य सेविका आशा सरवार, आशा वर्कर सारिका गुरव, व पुष्पा कर्णूक,ऑपरेटर प्रदीप कोळंबे व रोशनी कोळंबे समाजसेवक वासुदेव कर्णूक ग्रामपंचायत कर्मचारी मोतीराम कोळंबे, शरद तिखंडे यांचे विशेष सहकार्य लाभले.

तसेच गावातील तरुण वर्गातून सचिन हडप,प्रसाद कर्णूक, अतुल हडप,अक्षय तिखंडे, जयेश हडप, सौरभ राऊत,विजय हडप,प्रल्हाद मोहिते, गणेश हडप, अमीर तिखंडे,अभिषेक कर्णूक, सुशांत मोहिते, शुभम राऊत, धनेश हडप,सुरज हडप,शिवम हडप, प्रसाद आगज,यश हडप हे तरुण प्रामुख्याने मदतीसाठी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.