Press "Enter" to skip to content

खासदार सुनिल तटकरेंना राष्ट्रपतींनी पत्राद्वारे दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) :

कोकणचे भाग्यविधाते, रायगड लोकसभा मतदार संघांचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष खासदार सुनिल तटकरे यांचा ६५ वा वाढदिवस नुकताच १० जुलै रोजी संपन्न झाला. कोरोना महामारीच्या पार्शवभूमीवर खा. तटकरे यांनी कार्यकर्त्यांच्या प्रत्यक्ष शुभेच्छा न स्विकारता फोनद्वारे तसेच वृत्तपत्रांद्वारे स्वीकारून आपला वाढदिवस साधेपणात साजरा केला असला तरी कार्यकर्त्यांनी आपल्या लाडक्या नेत्याचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला. खा. तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारताचे महामहिम राष्ट्रपती माननीय रामनाथ कोविन्द यांनी खा तटकरे यांना पत्राद्वारे निरोगी व दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पत्राद्वारे शुभेच्छा देताना महामहिम राष्ट्रपती माननीय रामनाथ कोविन्द यांनी म्हटले आहे की, श्री सुनिल दत्तात्रेय तटकरे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. परमेश्वरने आपल्याला निरोगी, सदृढ आरोग्य व प्रसन्न ठेवावे आणि येणाऱ्या अनेक वर्ष आपण देशाची निष्ठापूर्वक सेवा करत राहावी अशा शुभेच्छा. अशा शब्दांत भारताचे महामहिम राष्ट्रपती माननीय रामनाथ कोविन्द यांनी खासदार सुनिल तटकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.