Press "Enter" to skip to content

कर्जत नगरपरिषद प्रभाग 2 मध्ये लसीकरण शिबिर संपन्न : 277 जणांनी घेतला लाभ

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

कर्जत नगरपरिषद प्रभाग क्रमांक -2 मध्ये दही वली संजय नगर येथे लसीकरण शिबीर संपन्न झाले या मध्ये 277 जणांनी लसीकरणाचा लाभ घेतला.

कर्जत उपजिल्हा रुग्णालयाच्या सहकार्याने आणि कर्जत नगरपरिषदेच्या पुढाकाराने लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नगरसेवक ॲड.संकेत भासे यांच्या सहकार्याने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.कोव्हीशिल्ड पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला.

दहीवली संजय नगर येथे नगरसेवक ॲड.संकेत भासे यांच्या जनसंपर्क कार्यालया मध्ये लसीकरण शिबिराचे आयोजन करणात आले होते. नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉ. मनोज बनसोडे, रविंद्र माने यांनी भेट दिली.

डॉ.संगीता दळवी यांच्या मार्गदर्शखाली लसीकरण मोहीम राबविण्यात आली. यावेळी कार्यकर्ते दिनेश कडू, विशाल बैलमारे,विनायक गायकवाड, सुहास दिघे, विशाल राठोड यांनी सहकार्य केले.कोव्हीशिड चा 256 व्यक्तींनी पहिला डोस व 21 व्यक्तींनी दुसरा डोस अश्या प्रकारे 277 नागरिकांचे लसीकरण झाले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.