Press "Enter" to skip to content

धुतूम ग्रामपंचायतमध्ये कोविड प्रतिबंध लसीकरण : अल्ट्रा टेक सिमेंट कंपनी तर्फे 121 डोसचा लसपुरवठा

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |

सरपंच व ग्रामपंचायत धूतूम यांनी केलेल्या पाठपुराव्यानुसार सीएसआर अंतर्गत अल्ट्रा टेक सिमेंट कंपनी तर्फे, धुतूम ग्रामपंचायत मध्ये कोविड प्रतिबंध लसीकरण आज यशस्वी पूर्ण केले. 121 डोसचा लसपुरवठा करून धुतूम नागरिकांना नव संजीवनी देण्यात आली.

सकाळी 11.00 ते संध्याकाळी 5.00 वाजेपर्यंत कोवीड लसीकरण धूतूम प्राथमिक शाळेत करण्यात आले. लसीकरण सकाळी 11 .00 वाजता चालू झाले या उपक्रमाला अल्ट्रा टेक सिमेंट कंपनीचे चे GM गुप्ता साहेब यांचे विशेष सहकार्य लाभले. तर केशव निषाद HR मॅनेजर आणि दिनेश दिनानी अकाउंट अधिकारी यांनी लसीकरणाला भेट दिली. सदर लसीकरण हे पटवर्धन हॉस्पिटल पनवेल यांच्या डॉक्टर टीम यांनी केले.

या छोटेखानी कार्यक्रमा वेळी माजी उपसरपंच सदानंद विठ्ठल ठाकूर, सदस्य शरद ठाकूर,ग्रामसेवक विनोद कृष्णा मोरे, मुख्याध्यापक मोकाशी सर, तंटामुक्त अध्यक्ष दत्ता धावजी ठाकूर, आणि ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामपंचायत लीपिक सुजाता ठाकूर,प्रणिता हत्नोळकर,श्रीमती मीना प्रकाश ठाकूर यांनी मोलाचे सहकार्य केले.

या लसीकरणाच्या माध्यमातून बऱ्या पैकी गावातील नागरिकांचे पहिल्या डोसचे लसीकरण पूर्ण झाले असून गावातील भाडोत्री नागरिकांना देखील लसीकरण करण्यात आले. या उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक केले तर सरपंच रेश्मा शरद ठाकूर यांनी अल्ट्रा टेक सिमेंट कंपनीचे, पटवर्धन हॉस्पिटल पनवेल डॉक्टर यांचे व उपक्रम यशस्वी करणाऱ्या सहकाऱ्यांचे आभार व्यक्त केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.