Press "Enter" to skip to content

उरणचे जेष्ठ समाजसेवक संग्राम तोगरे यांचे औषध दानाचे कार्य

संपूर्ण महाराष्ट्रात 1 कोटी 54 लाख 24 हजारांचे गोरगरिब व विविध संस्थाना मोफत औषधांचे वाटप

सिटी बेल लाइव्ह / उरण / (विट्ठल ममताबादे)


देश परदेशात कोरोनाचा वाढलेला प्रचंड कहर पाहून समस्त मानवप्राणी अस्वस्थ व जीवघेणी दहशतीखाली जगत आहेत. लाॅकडाऊनच्या दबावात नोकरी सांभाळण्याची तारेवरची कसरत, त्यात लहान मोठे उद्योग धंदे बंद.गाड्या रिक्शा बंद, व्यापार, शाळा कॉलेज बंद यामुळे सारे त्रस्त.” घरात रहा सुरक्षित व्हा ” चा जप करीत जगताना पराकोटीचे झाले आहे.

यातच उरणचे जेष्ठ समाजसेवक संग्राम तोगरेच्या जनसेवेवरही यांचा परिणाम झाल्याने घरातील तेरा मोठे बाॅक्स भरलेली औषधे जिल्हा रुग्णालय रत्नागिरी, प्राथमिक आरोग्य केंद्र लांजा व ग्रामिण रूग्णालय इगतपुरी येथे दान देण्याची त्यांची इच्छा होती मात्र तो ठराव रहित झाल्याने ते अस्वस्थ झाले.

समाजसेवक संग्राम तोगरे यांचे ७४ वयोमान असल्याने तसेच लॉक डाउन असल्याने “मी प्रत्यक्ष दान देऊ शकत नाही तरी माझ्या घरून औषधे घेऊन जावे” अशी विनंती त्यांनी त्यांच्या परिचयातील डॉक्टरांना केली .कित्येकांनी होकार दिला पण कुणीही फिरकले नाही.शेवटी माऊली चॅरिटेबल अॅन्ड मेडिकल टृस्ट मुंबईचे अध्यक्ष डॉक्टर दिपक मोहिते व त्यांची पत्नी डॉक्टर अनुराधा मोहिते हे आपल्या रुग्ण वाहिकेने आले.

संग्राम तोगरे व मुक्ताई महिला उत्कर्ष मंडळाच्या अध्यक्षा सुमनताई संग्राम तोगरे यांनी त्यांचे उरण मध्ये त्यांच्या घरी ड़ावुर नगर येथे स्वागत केले. ४७९ प्रकारची ५ मोठे बाॅक्स भरलेली साधारण २,७५,०००/- रूपये किंमतीचे औषधे साहित्य रत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या ५१ व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने औषधे दान केले. लाॅकडाऊन काळातही तोगरे दांपत्यांचा जनसेवेत खंड पडला नाही याचा मनस्वी आनंद झाला असे मत डॉ मोहिते यांनी व्यक्त करत तोगरे यांचे आभार मानले.

यावेळी तोगरे यांनी डॉक्टरांचेही जनतेला देत असलेल्या सेवेबद्दल आभार मानले. संग्राम तोगरे व त्यांची पत्नी सुमनताई संग्राम तोगरे या दांपत्यानी आज पर्यंत महाराष्ट्राच्या २५ जिल्ह्यातील ८१ सरकारी रुग्णालयात व ३० विविध नोंदणीकृत सामाजिक संस्थांना १,५४,२४,०००/- रूपये(एक कोटि चोपन्न लाख चोवीस हजार रुपये ) किंमतीचे औषध स्वत: जावून दान दिले आहेत.

एवढेच नाही तर नाशिक, पालघर व रायगड जिल्ह्यातील काही आश्रम शाळेत शालेय साहित्य आणि नाशिक, ठाणे, पालघर तथा रायगड जिल्ह्यातील गरीब गरजूनां त्यांच्या वाड्या- पाडयावर जाऊन सर्व प्रकारची नवे- जुणे कपडे दान देऊन नवा विक्रम केलेला आहे म्हणून यां दांपत्यांचा अनेक गौरवास्पद पुरस्कार सत्कार सुद्धा करण्यात आलेला आहे. तसेच शासनाचे विविध सन्मान, पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत.

आजच्या धक्काधक्कीच्या व जीवघेण्या स्पर्धेच्या युगातही तोगरे कुटुंबियांतर्फे समाजाप्रती असलेली निष्ठा व तळमळ,त्यांचे निस्वार्थ सामाजिक कार्य वाखानण्याजोगी,कौतुकास्पद, सर्वांना प्रेरणा देणारी व आदर्शवत अशी आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.