Press "Enter" to skip to content

नवी मुबईतील 146 पोलिसांना कोरोनाची लागण…


वाहनावर कारवाई करणे पडले भारी…

नवी मुबईतील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

सिटी बेल लाइव्ह / पनवेल (वार्ताहर):

नवी मुबई पोलीस दलात काम करणाऱ्या 146 पोलीस कर्मचारी आणि अधिकारी त्या सोबत त्याच्या कुटूंबाना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांपैकी 50 टक्के कर्मचारी व त्याचे कुटूंबीय कोरोनावर मात करून घरी परतले आहे.

अनलॉक प्रक्रिये नंतर, पोलीस विभागाकडून सुरू करण्यात आलेल्या वाहनावरील कारवाई मुळे पोलीस कर्मचाऱ्याच्या बधितांचा आकडा हा झपाट्याने वाढू लागला आहे. अशी चर्चा पोलीस वर्गात आहे. गेल्या 48 तासात 24 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्या मध्ये कामोठे पोलीस ठाण्यातील 8 कर्मचाऱ्यांना लागण झाल्याचे समोर आले आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्या नंतर, कोरोना विषाणूचा सर्वाधीक फटका हा पोलीस कर्मचाऱ्यांना बसला आहे. राज्यात जवळपास 4 हजाराहून आधीक पोलीस कर्मचारी आणि अधिकारी वर्गांना कोरोनाची लागण झाली आहे. त्या पैकी मुबई पोलीस दलातील सर्वधीक पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्या पाठोपाठ आता नवी मुबई पोलीस दलातील कर्मचारी या आजाराला बळी पडू लागले आहे.

मार्च महिन्यात कोरोनाचा विषाणू आढळून आल्या नंतर राज्यात लॉक डाऊन ची घोषणा करण्यात आली जवळपास 3 महिन्याच्या लॉकडाऊन नंतर अनलॉक ची प्रक्रीया सुरू करण्यात आली. या अनलॉक नंतर रहिवाशी बाहेर पडू लागल्या मुळे, पोलीस कर्मचारी यांचा संपर्क वाढू लागल्यामुळे पोलीस कर्मचारी यांना कोरोना विषाणूची लागण होऊ लागल्याचे समोर आले आहे. आता पर्यत 4 हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

त्या पाठोपाठ मुबई पोलीस दलातील अधिक कर्मचारी आणि अधिकारी या विषाणूच्या विळख्यात अडकू लागले आहे. मुबई पोलीस दला नंतर, नवी मुबई पोलीस दलातील कर्मचारी या विषाणूच्या विळख्यात अडकू लागले आहे. अनलॉक च्या प्रक्रिये नंतर नवी मुबई आणि पनवेल परिसरातील रूग्ण संख्यामध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. नवी मुबई परिसरातील कोरोनाबधितांचा आकडा हा 14 हजाराच्या घरात पोचला आहे. त्या सोबत पनवेल महानगरपालिका हद्दीतील कोरोना बधितांची संख्या 5 हजाराच्या आसपास गेली आहे. अश्या परस्थिती मध्ये देखील नवी मुबई पोलीस दलातील आपले कर्तव्य चोख बजावताना दिसून येत आहे. अगदी 24 तासातील 14 तास रत्यावर उभे राहून कर्तव्य पार पाडत आहे. हे कर्तव्य पार पाडत असताना नवी मुबई पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या माथी आता वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी या नवी मुबई पोलीस दलातील कर्मचारी आणि अधिकाऱ्याना दिली आहे. त्या नुसार चैका चैकात उभा राहून हे कर्मचारी दुचाकी आणि चार चाकी वाहनांवर कारवाई करताना दुसून येत आहे. या कारवाई मुळे या पोलीस कर्मचाऱ्याचा अधिक संपर्क हा या रहिवासी आणि प्रवाशी यांच्या सोबत येऊ लागला आहे. कारवाई दरम्यान वाहनाची कागदपत्रे तपासणे त्याची अधिक चैकशी करणी या मुळे त्याचा थेट संपर्क हा येऊ लागला आहे. त्या नंतर त्याची वाहने जप्त करणे त्यांना कोर्टात हजर करणे यां सारख्या जबाबदारी कामामुळे आता पोलीस कर्मचारी कोरोना सारख्या विषाणूला बळी पडू लागले आहे.

या पोलीस कर्मचारी यांना याची लागण झाल्या नंतर त्याचे कुटूंब देखील याला बळी पडू लागले आहे. नवी मुबई पोलीस दलातील 146 कर्मचारी या आजाराला बळी पडले आहेत. त्या सोबत त्याच्या कुटूंबाना देखील यांची लागण होऊ लागली आहे. तर यातील 50 टक्के हुन अधिक कर्मचारीयांनी कोरोनावर मात करून घरी परतले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.