Press "Enter" to skip to content

भारताच्या युद्ध बाह्य प्रयत्नांना प्रचंड यश

गलवान दरी मधून चिनी सैन्याची माघार

भारतीय सैन्य चीनच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवून

सिटी बेल लाईव्ह / लडाख #

गलवान दरीमध्ये भारत व चीन सैन्यादरम्यान झालेल्या चकमकीमुळे या दोन देशांतील संबंधांचे राजकारण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. दोन्ही सैन्यांच्या कॉर्प्स कमांडर दरम्यान बैठका सुरू असतानादेखील भारतामध्ये उथळ राजकारणाचा खळखळाट बघायला मिळाला. काँग्रेस सारख्या मोठ्या पक्षाचे मोठे नेतृत्व असणाऱ्या राहुल गांधी यांनी उथळ वक्तव्य करत अपरिपक्वतेचे परिपूर्ण प्रमाण दर्शविले होते. या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र खंबीर पणे आंतरराष्ट्रीय राजकीय पटलावरील त्यांचे कौशल्य पणाला लावत चीनची सर्व बाजूने कोंडी केली होती. भारतीय सैन्याने त्यांच्या अधिकृत पेजवर चीन सैन्य गलवान मधून साधारण दोन किलोमीटर मागे हटत असल्याची बातमी प्रसिद्ध केली आहे. असे असले तरीसुद्धा चीन सैन्याकडून गलवान व अन्य सीमावर्ती भागामध्ये लष्कराची जमवाजमव करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर चीन सैन्याच्या प्रत्येक हालचालीवर भारतीय सैन्य बारीक लक्ष ठेवून आहे.
गलवान खोऱ्यामधून चीन सैन्य माघार घेत असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती तोंडसुख घेणाऱ्या विरोधकांच्या तोंडात मात्र माती केली आहे.

भारत आणि चीन सीमावादावर मोठी घडामोड आज समोर आली आहे. पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यातून चीनने आपलं सैन्य दीड ते दोन किलोमीटर मागे घेतलं आहे. माहितीनुसार चिनी सैन्यानं 1.5 ते 2 किमी पर्यंत आपले तंबू मागे घेतले आहेत. हे तंबू चीनने पेट्रोलिंग प्वाईंट 14 च्या मागे घेतले आहेत. पेट्रोलिंग प्वाईंट 14 ही तिच जागा आहे जिथं 15-16 जून दरम्यान रात्री भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये हिंसक झटापटीत 20 भारतीय सैनिक शहीद झाले होते. तर भारतीय सैन्याने शौर्य गाजवन किमान 56 चिनी सैनिक ठेचले.चीनने हे तंबू तणाव निवळण्यासाठी केलेल्या चर्चेनंतर हटवले आहेत. दोन्ही देशांनी डिसएंगेजमेंटवर सहमती दर्शवली आहे. या अंतर्गत सैन्य सध्याच्या ठिकाणावरुन मागे हटलं आहे. तणाव निवळण्यासाठी भारतीय सैन्य आणि चिनी सैन्यांमध्ये नियंत्रण रेषेवर बफर झोन बनवण्यात येणार आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.