Press "Enter" to skip to content

मोदींमुळे मोडले लग्न : वाचा हा किस्सा !

सिटी बेल लाइव्ह / लखनऊ #

सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थकांना अंधभक्त तर विरोधकांना चमच्या याच नावाने संबोधण्याचा ट्रेंड सुरू आहे. देशभरात हे वाद प्रत्येक पातळीवर जोरात सुरू असतं. परंतु या वादाने आता एक ठरलेलं लग्न मोडले आहे. आणि याला जबाबदार कोण तर चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी ! काय म्हणता कसं तर वाचा ही बातमी..

लग्न करताना मुला मुलींचे स्वभाव जुळले नाही तरी विचार मात्र जुळायलाचं हवेत. आता हेच पहा ना छान आनंदाने ठरलेल्या लग्नात पंतप्रधान मोदींचा विषय निघाला आणि या विषयावर चर्चा एवढ्या पातळीवर गेली की, लग्नचं मोडले.

ही घटना उत्तर प्रदेशातील असली, तरी शहर आणि त्या मतभेद झालेल्यांची नावे दिलेली नाहीत. त्याचे झाले असे की, उत्तर प्रदेशातील एका उद्योगपतीचे आणि सरकारी नोकरदार असलेल्या युवतीचे लग्न ठरले. मुलाला मुलगी आणि मुलीला मुलगा अगदी पसंत होते. मग लग्नाची अंतिम बोलणी करण्यासाठी उभयतांनी मंदिरात भेटण्याचे ठरले होते. सर्व काही सुरळीत सुरु असतानाच ऐनवेळी चर्चेत देशातील आर्थिक स्थितीचा मुद्दा उपस्थित झाला आणि इथेच माशी शिंकली.

यावेळी देशातील स्थितीला मोदीच कारणीभूत असल्याचा युक्तीवाद त्या युवतीने केला. त्यानंतर मोदी प्रेमी असलेल्या त्या उद्योगपतीला आपल्या होणाऱ्या बायकोचा युक्तीवाद अजिबात पटला नाही. त्याने सगळे आरोप परतावून लावले. हा वाद इतका टोकाला गेला की दोघांनीही ठरलेलं लग्न मोडून टाकण्यात आल्याचे जाहीर केले.

आता या दोघांनी घेतलेल्या निर्णयामुळे दोन्ही कडील कुटुंब चक्राऊन गेले असून आता पुढची सोयरीक शोधताना या मोदी समर्थक की मोदी विरोधक ही गोष्ट तपासून पाहण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.