Press "Enter" to skip to content

महाराष्ट्र युवा प्रतिष्ठान पाणदिवे च्या वतीने कोप्रोलीच्या डॉक्टरांचा सन्मान


सिटी बेल | मनोज पाटील | पाणदिवे |

कोविड १९ या जागतिक महामारीच्या लाटेमध्ये कोविड रूग्णांच्या प्रत्यक्ष सेवेसाठी आपल्या जीवाची बाजी लावून उरण तालुका कोविड मुक्त करण्यासाठी झटणार्या डॉ.सिध्दराम अरवत्ति व त्यांची पत्नी डॉ.सिमा अरवत्ति या दोन डॉक्टरांचा महाराष्ट्र युवा प्रतिष्ठान पाणदिवे च्या वतीने कोरोना देवदूत २०२१ सन्मानपत्राने नुकतेच गौरविण्यात आले.

या दोन डॉक्टरांनी कोप्रोली येथील आपल्या सिध्दिविनायक मल्टीस्पेशालिटी रूग्णालयात अगदी अल्पदरात व बोकडविरा येथील शासकीय कोविड सेंटरमध्ये मोफत मानव सेवा केली ते महान कार्य सदैव स्मरणात राहावे या साठी कोविड सेंटर बोकडविरा येथे झालेल्या कार्यक्रमात उरण तालुका आरोग्य अधिकारी राजेंद्र इटकर , महाराष्ट्र युवा प्रतिष्ठान पाणदिवे चे संस्थापक अध्यक्ष मनोज पाटील ,वटवृक्ष सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण मढवी यांच्या हस्ते डॉ.सिध्दराम अरवत्ति व डॉ. सिमा अरवत्ति ह्या देवदुतांना गौरविण्यात आले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.