Press "Enter" to skip to content

अतितीव्रतेच्या बोर ब्लास्टिंग मुळे ओवळे गावातील घरांना तडे

ओवळे ग्रामपंचायतीची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार !

शिवसेना शाखाप्रमुख प्रशांत पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे !

संतापलेले ग्रामस्थ तिव्र आंदोलनाच्या तयारीत

सिटी बेल लाइव्ह / स्पेशल रिपोर्ट #

पनवेल तालुक्यातील ग्रामपंचायत ओवळे हद्दीतील विमानतळ गाभाक्षेत्रा बाहेरील सर्वे क्रमांक १९२/१९३ येथे ओवळे गावाजवळील टेकडी सपाटीकरण चे काम ५० मिटर अंतरावर सिडको मार्फत भारती इन्फ्रा प्रो .करत आहे. याठिकाणी
अतीतीव्रतेची ब्लास्टींग होत असल्या कारणाने गावातील रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. येथील सर्व रहिवाशी घरांना ब्लास्टिंग चे तीव्र हादरे लागल्या मुळे तडे गेले आहेत. अशाच प्रकारे ब्लास्टिंग रोज चालत राहिलं तर घर कोसळून जीवित हानी होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. त्याचप्रमाणे धूळ सुद्धा अती प्रमाणात उडत असल्याने ,लहान मुलं व वृद्ध व्यक्ती मध्ये आजारच प्रमाण वाढत आहे. याबाबत ओवळी ग्रामपंचायतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे तर शिवसेना शाखाप्रमुख प्रशांत पाटील यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे दाद मागीतली आहे.

ओवळे ग्रामपंचायतीने जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे केलेल्या तक्रारीत काय म्हटले आहे ?

ओवळे गावातील ग्रामस्थांची विमानतळ प्रकल्पासाठी जवळ जवळ ३०० ते 3५० हेक्टर जमिन सिडको प्रशासनास दिलेली असून त्याच्या मोबदल्यात शासनाचे दिलेले २२.५% चे भूखड आजतागायत पुष्पकनगर ला अविकसित आहेत. आज ओवळे ग्रामपंचायत कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. ग्रामस्थांनी लेखी स्वरुपात केलेल्या मागणीनुसार अति तीव्रतेच्या बोर ब्लास्टिंग मुळे अनेक राहती रहिवाशी घरांना तडे जाऊन घरे निकामी झालेली आहेत. त्या घराचे व पुढे जाऊन नुकसान होणाऱ्या राहत्या रहिवाशी घरांना भरपाई मिळत नाही तोपर्यंत ओवळे गावाजवळील सर्वे नंबर १९२/९९३ या टेकडी चे सपाटीकरणाचे काम थाबबावे. असे न केल्यास संपूर्ण ओवळे गावातील ग्रामस्थ तीव्रतेचे आंदोलन करण्याचे तयारीत आहेत असे त्यांनी ग्रामपंचायत ला लेखी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

ग्रामस्थांच्या प्राप्त पत्राचे ग्रामपंचायत मासिक सभा माहे २४ जून २०२० रोजी सभेचे अध्यक्ष मा.सरपंच यांनी वाचन केले असता उपस्थित सर्व सदस्य यांनी एक मुखाने असा ठराव पारित केला की, संबधित ठेकेदार यांच्या कडून होणारी अतितीव्रतेची बोर ब्लास्टिंग त्वरित बंद करण्यात यावी. असा ठराव पारित केला असून सर्वानुमते मंजुरी घेण्यात आली. आपण आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील २५ अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे. व त्यातील पोट कलम २ (अ) नुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हे प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. तसेच आपण हि या व्यवस्थापनाचे एक घटक आहेत, अति तीव्रतेच्या बोर ब्लास्टिंग मुळे अनेक राहती रहिवाशी घराना तडे गेले आहेत.जिल्हा प्रशासनामार्फत अश्या सर्व घराचे सरकारी पंचनामे हि झालेले आहेत. पण आज तागायत त्यांना कोणतीही नुकसान भरपाई मिळाली नाही. याचे प्रथमतः जिल्हाप्रशासन याने ग्रामपंचायत ओवळे यांना लेखी उत्तर द्यावे. अश्या वेळी काही जिवित हानी झाल्यास या सर्व बाबींना आपणच जबाबदार असाल असे आम्हाला म्हणावे लागेल. आपणास हे पत्र मिळताच आपण गावाशेजारील ५० मीटर अंतरावरील गाभाक्षेत्राबाहेरील ग्रामपंचायत हद्दीतील सर्वे नंबर १९२/१९३ मधील होत असलेली अतितीव्रतेची बोर अलास्टिंग बंद करून ओवळे गावातील संतापलेले भीतीचे वातावरण शांत करून ग्रामस्थाचे मुलभूत हक्क अबाधित ठेवावे.Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.