Press "Enter" to skip to content

निळ्या खेकड्यांचे रक्त फेम कादीर कच्छी ला पुन्हा पोलीसांच्या बेड्या

शेकाप पनवेल विधानसभा उपाध्यक्ष कादीर कच्छी याला गुजरात पोलिसांनी घेतले ताब्यात

सिटी बेल | पनवेल | वार्ताहर |

शेकापचे पनवेल विधानसभा उपाध्यक्ष अब्दुल कादिर इब्राहिम कच्छी यांना गुजरात राज्यातील पोलिसांनी फसवणूक प्रकरणी पनवेल तालुक्यातील नांदगाव परिसरातून ताब्यात घेतले आहे.

शेकाप पनवेल विधानसभा उपाध्यक्ष अब्दुल कादिर इब्राहिम कच्छी (वय-४४) यांच्यावर यापूर्वीही अशा प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अशाच प्रकारे फसवणूकीचा गुन्हा ४२०, १२० बीसह आयटी एक्ट अंतर्गत गुजरात राज्यात दाखल करण्यात आल्याने सायबर क्राईम पोलिस स्टेशन अहमदाबादचे सब इन्स्पेक्टर के.एम. परमार व त्यांच्या पथकाने पनवेल जवळील नांदगाव हद्दीत असलेल्या मॅरेथॉन कॉलनीतून स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने त्यांना ताब्यात घेऊन गुजरात येथे रवाना झाले आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.