Press "Enter" to skip to content

जय भवानी जय शिवाजी या घोषणेला विरोध करणाऱ्यांचा जाहीर निषेध

छत्रपतींच्या जयघोषानेला विरोध करणाऱ्यांचे इनबॉक्स भरून टाकणार

माहाविकास आघाडी च्या घटक पक्षांचे “ईमेल भेजो” आंदोलन

सिटी बेल लाइव्ह / पनवेल #

वेंकय्या नायडू यांनी राज्यसभेवर नियुक्त छत्रपती उदयन राजे भोसले यांच्या शपथ विधी नंतर केलेल्या जय भवानी जय शिवाजी या घोषणेला विरोध केल्याच्या घटनेचे राज्यभरातून तीव्र पडसाद उमटत आहेत. शिवप्रेमींच्या मध्ये संतापाची लाट उसळली आहे.पनवेल मधील माहाविकास आघाडी च्या घटक पक्षांतील कार्यकर्त्यांनी एकत्र येत नायडू यांचा इनबॉक्स छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकारा च्या ई मेल मेसेजने भरून टाकणार असल्याची घोषणा केली. शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल महानगरपालिका क्षेत्र चिटणीस गणेश कडू यांनी आमच्या प्रतिनिधीला ही माहिती दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज दुपारी तातडीची बैठक घेत छत्रपतींच्या जय जय कारा ला जे जे कोणी विरोध करतील त्यांचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करू अशी भूमिका मांडली. अशा पद्धतीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि आई भवानी यांच्या नावाला विरोध करणाऱ्यांनी आमच्या भावना दुखावल्या असल्याची प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
याबाबत प्रतिक्रिया देताना गणेश कडू म्हणाले की पत्र पाठवून आंदोलनाची नौटंकी आम्हाला देखील करता आली असती.परंतु असल्या पत्रांवर खर्च करण्यापेक्षा तेवढ्याच किमतीचे कोरोना महामारी मध्ये उपयोगी पडणारे साहित्य आम्ही पालिकेला देऊ. महाविकास आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता त्याच्या ई मेल द्वारे किंवा सोशल मीडियाच्या उपलब्ध माध्यमातून नायडू यांच्या पर्यंत छत्रपतींच्या जयघोषाचे संदेश पोहोचवणार आहोत.
या बैठकीला शेकाप चे पनवेल महानगरपालिका चिटणीस गणेश कडू,राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेश सरचिटणीस सूरदास गोवारी,शेकाप पनवेल तालुका चिटणीस राजेश केणी,काँग्रेस चे पनवेल जिल्हा कार्याध्यक्ष सुदाम पाटील,युवक काँग्रेस चे रायगड जिल्हा अध्यक्ष हेमराज म्हात्रे,पनवेल महानगर पालिकेतील नगरसेवक विजय खानावकर, शिवसेनेचे शहर अध्यक्ष प्रथमेश सोमण,राष्ट्रवादी युवक प्रदेश सचिव संदीप म्हात्रे, पनवेल विधानसभा अध्यक्ष दर्शन शेठ ठाकूर, आदी मान्यवरांच्या सह कार्यकर्ते उपस्थित होते.
या बैठकीचे निमंत्रक सुदाम पाटील,प्रथमेश सोमण,गणेश कडू,दर्शन ठाकूर यांनी प्रसिद्धी माध्यमांना कळविले आहे की,

व्यंकय्या नायडू यांच्या भूमिकेला विरोध म्हणून शनिवार दिनांक 24 जुलै रोजी सकाळी 11 वाजता एकाच वेळी पनवेल महानगरपालिका क्षेत्रात सहा ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून श्री वेंकय्या नायडू यांना 10000 ई-मेल धाडण्याचा संकल्प आम्ही सोडला आहे.महामारीच्या कालखंडात सोशल डिस्टन्स राखत आणि सर्व नियम पाळत आम्ही हे आंदोलन करणार आहोत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.