Press "Enter" to skip to content

को.प्र.बौ.महासभेचे अध्यक्ष प्रभाकर गायकवाड यांचे हृदयविकाराने निधन


सिटी बेल लाइव्ह / पेण (प्रतिनिधी)

आंबेडकरी चळवळीतील एक जेष्ठ कार्यकर्ते पेण तालुक्यातील वडखळ येथील रहिवासी आणि कोकण प्रदेश बौद्ध महासभेचे संस्थापक अध्यक्ष जेष्ठ बौध्दाचार्य प्रवचनकार तसेच अनेक सामाजिक संघटनेत काम करणारे सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर गायकवाड यांचे आज सकाळी मॉर्निंग वॉकला जात असताना तांबडी येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले निधना समयी त्यांचे वय ५० च्या आसपास होते अतिशय शांत तसेच प्रेमळ स्वभाव मनमिळाऊ पणा यासह प्रत्येकाला आदराने आवाज देणारे बौध्द समाजासह इतर समाजातील प्रत्येकाच्या सुखादु:खात सहभागी होणारे प्रभाकर गायकवाड यांच्या निधनाची बातमी समजताच पेण तालुक्यावर दुःखा चे सावट पसरले असुन आंबेडकरी चळवळीची फार मोठी हानी झाली आहे.त्यांची अंत्ययात्रा वडखळ येथून काढण्यात आली असून मुंबई, ठाणे, पुणे, पनवेल, खोपोली ,माणगाव आदि जिल्ह्यांतून कार्येकर्ते अंत्ययात्रेत सहभागी झाले होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.