Press "Enter" to skip to content

गुड न्यूज : राज्यात स्विमिंग पूल, जिम, शॉपिंग मॉल सुरू होणार

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची पञकार परिषदेत माहिती

सिटी बेल लाइव्ह / मुंबई #

राज्यातील स्विमिंग पूल, व्यायामशाळा (जिम) आणि शॉपिंग मॉल सुरू करण्यास परवानगी देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. आरोग्य विभाग त्यासाठी मार्गदर्शक सूची तयार करत असून अंतिम निर्णय मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील, असेही टोपे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

सध्या ३१ जुलै पर्यंत काही प्रमाणात लॉकडाऊन आहे.मात्र, मिशन बिगिन अगेनअंतर्गंत अनेक उद्योगांना परवानगी देण्यात आली आहे. जास्तीत जास्त गोष्टी पुन्हा सुरु केल्या जात आहेत. त्यानुसार सध्या बंद असलेले स्विमिंग पूल, जिम आणि शॉपिंग मॉल सुरु करण्याबाबत राज्य सरकार विचार करत आहे. जिम हे जनतेच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे काही नियम-अटींच्या शर्थींवर स्विमिंग पूल, जिम आणि शॉपिंग मॉल सुरू केले जाऊ शकतात, असे टोपे यांनी सांगितले.

लोकल सुरु करण्याची मागणी

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांप्रमाणेच आम्हालाही रेल्वेने प्रवास करण्याची मुभा द्या, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. यासाठी शेकडो संतप्त प्रवाशांनी नालासोपारा येथे जोरदार आंदोलन केले. यावर टोपे म्हणाले, लोकल सेवा सुरु करण्याची मागणी अगदीच रास्त आहे. मात्र, ट्रेनमध्ये सोशल डिस्टनसिंग पाळले जाणार नाही, त्यामळे लोकल ट्रेन सुरु करायच्या की नाही याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील.

पुण्यातही मिशन झिरो : मुंबई प्रमाणे पुण्यात देखील मिशन झिरो मोहीम राबविण्यात येत आहे. कोविड सेंटरमध्ये महिलांवर अत्याचाराच्या घडलेल्या घटना असल्याने त्या सेंटरवर पूर्ण सुरक्षा दिली आहे. कोणत्याही हॉस्पिटलला रुग्णांना नाकारता येणार नाही. आता पंधरा मिनिटात रिपोर्ट मिळतील अशा टेस्ट आल्या आहेत. त्याचे किट सर्व खाजगी हॉस्पिटल्सने ठेवावे. रुग्णांना तपासून दाखल करून घ्यावे. मात्र रुग्णांना परत पाठवून देण्याची तक्रार आली तर अशा व्यवस्थापनावर देखील योग्य ती कारवाई केली जाईल, असे टोपे यांनी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.