Press "Enter" to skip to content

मोदींच्या लोकप्रियतेला कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा जबरदस्त तडाखा

सर्वात वाईट कामगिरी करणारा नेता कोण ? 90 टक्के म्हणाले नरेंद्र मोदी !

अमेरिकेमधील द कॉनव्हर्सेशन या वेबसाईटने ट्विटरवर घेतलेल्या जनमत चाचणीत पंतप्रधान मोदी फेल !

सिटी बेल । नवी दिल्ली ।

भारतामध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार उडालाय. अनेक राज्यांमध्ये आरोग्य सुविधांची कमतरता दिसून येत आहे. औषधं, ऑक्सिजन बेड्स आणि लसींच्या तुटवड्यामुळे अनेक स्तरांमधून केंद्र सरकारच्या ढीसाळ कारभारावर टीका केली जात आहे. आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी भारतामधील करोना परिस्थिती हाताळण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणि त्यांच्या सरकारला अपयश आल्याची टीका अनेक लेखांमधून केल्याचं दिसत आहे. अशाच प्रकारे जगभरात करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांमधील नेत्यांसंदर्भात घेण्यात आलेल्या एका ऑनलाइन जनमत चाचणीमध्ये सर्वात वाईट कामगिरी करणारा नेता कोण असा प्रश्न विचारण्यात आला होता. या जनतमचाचणीमध्ये ९० टक्के लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मत दिलं आहे.त्यामुळे करोनाचा सर्वाधिक फैलाव झालेल्या देशांमध्ये सर्वात वाईट कामगिरी करणारे सर्वोच्च नेतृत्व म्हणून मोदींना सर्वाधिक मतं मिळाली आहेत.

अमेरिकेमधील द कॉनव्हर्सेशन या वेबसाईटने ट्विटरवर घेतलेल्या जनमत चाचणीमध्ये करोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव झालेल्या देशांपैकी भारतीय नेतृत्व हे साथरोगाची परिस्थिती हातळ्यात सर्वात सुमार कमागिरी करणारं ठरल्याचं दिसून आलं आहे. आम्ही पाच देशांमधील तज्ज्ञांच्या मदतीने त्यांच्या देशातील नेतृत्वाने कशाप्रकारे ही साथ हाताळताना गोंधळ घातला यासंदर्भातील आढावा घेतलाय, असं सांगत द कॉनव्हर्सेशनने जनमत जाणून घेण्यासाठी एक ट्विटर पोल घेतला. “सर्वात वाईट कामगिरी कोणी केली?, ट्विटरवर केवळ चारच पर्याय देता येतात. त्यामुळे या चार पर्यायांपैकी इतर काही उत्तर असेल तर कमेंट करुन कळवा,” असं म्हणत पोल पोस्ट करण्यात आला होता. या प्रश्नासाठी ब्राझीलचे बोल्सोनारो, भारताचे मोदी, मॅक्सिकोचे अ‍ॅमलो आणि अमेरिकेचे ट्रम्प, असे चार पर्याय देण्यात आले होते.

या पोलमध्ये ७५ हजार ४५० जणांनी आपली मतं नोंदवली. त्यापैकी सर्वाधिक मतं म्हणजेच ९० टक्के मतं ही मोदींना मिळाली. म्हणजेच ७५ हजार ४५० जणांपैकी ६७ हजार ९०५ जणांनी मोदी हे जगामध्ये करोना परिस्थिती हातळ्यात सर्वात वाईट कामगिरी करणारे नेते असल्याचं म्हटलं आहे. त्या खालोखाल अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ५ टक्के तर बोल्सोनारो यांना ३.७ टक्के मतं मिळाली आहेत. मॅक्सिकोच्या अ‍ॅमलो यांना या पोलमध्ये केवळ १.३ टक्के मतं मिळाली आहेत.

या पोलखालील कमेंट सेक्शनमध्ये अनेकांनी जागतिक स्तरावरही मोदींना सर्वाधिक मतं मिळाल्याबद्दल भाजपा विरोधक आणि समर्थकांमध्ये शाब्दिक वाद झाल्याचं पहायला मिळत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.