Press "Enter" to skip to content

श्रावणात भीमाशंकर ला जाऊ नका : गाडी होईल जप्त

सिटी बेल लाइव्ह / भीमाशंकर #

दरवर्षी प्रमाणे या श्रावणात देखील आपण भीमाशंकरला दर्शनाला जाण्याचा विचार करत असाल तर जाऊ नका. कारण कोरोना विषाणूच्या महामारीमुळे बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे असणारे श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये श्रावण महिन्यातही बंद राहणार आहे. त्यामुळे भाविकांनी भीमाशंकराचे दर्शन घेण्यासाठी येऊ नये, असे आवाहन भीमाशंकर देवस्थानाने केले आहे.

श्री क्षेत्र भीमाशंकर येथे श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर बैठक आयोजित करण्यात आली.

या वेळी घोडेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रदिप पवार, देवस्थानचे विश्वस्त मधुकर गवांदे, रत्नाकर कोडीलकर, दत्ता कौदरे, गोरक्षनाथ कौदरे आदी उपस्थित होते. श्री क्षेत्र भीमाशंकर येथे दरवर्षी भरणारी श्रावण महिन्यातील यात्रा कोरोनाच्या पार्श्वभुमीवर रद्द झाली आहे. डिंभे, पालखेवाडी व श्री क्षेत्र भीमाशंकर येथे पोलिसांनी चेकपोस्ट उभारले आहे. त्यामुळे या भागात श्री क्षेत्र भीमाशंकरचे दर्शन व पर्यटनासाठी आढळून आल्यास संबंधिताची गाडी जप्त करून कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करणार आहे. त्यामुळे येणाऱ्या भाविकांनी व पर्यटकांनी प्रशासनास सहकार्य करावे. अन्यथा, येणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा सहायक पोलिस निरीक्षक प्रदिप पवार यांनी दिला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.