Press "Enter" to skip to content

तिसरा पंच – भाग 2

तिसरा पंच – भाग 2

देशाच्या सर्वात मोठ्या नेत्यासाठी नुकतेच एक प्रशस्त आणि सर्व सुखसोयींनी युक्त असे विमान घेतले होते.. त्याला पाहण्यासाठी विमानतळावर प्रचंड गर्दी उसळली होती.. त्या कौतुकाने पाहणाऱ्या गर्दी कडे  विमानाने पाहिले .. त्याचा ऊर भरून आला.. इंजिन स्टार्ट झाले.. बघता बघता ते भव्य विमान धावत जाऊन आकाशात उंच उंच उडाले.. त्याने  उंच उडणाऱ्या विमानाने, जेंव्हा खाली पाहिले तिथे त्याला एक पक्षी उडत असलेला दिसला.. उडणाऱ्या पक्षाकडे तुच्छतेने बघत आपल्या स्वतःवर ते विमान प्रचंड खुश झाले.. स्वच्छन्दी तो पक्षी मात्र आपल्या मनाप्रमाणे गिरकी घेऊन, मस्त बागडत होता .. 

तेवढ्यात पायलट ने विमानाची दिशा बदलली.. आणि त्या विमानाला पायलट च्या मनाप्रमाणे वळावेच लागले…


दोन मैत्रिणी बागेत एका बेंचवर बसल्या होत्या.. त्यातल्या एकीचा बांध फुटला.. ती रडू लागली ..रडणाऱ्या तिच्या खांद्यावर हात ठेवून तिची मैत्रीण म्हणाली.. “अगं रडू नकोस, मला सगळं सांग तुझे गुपित, बोलण्याने हलकं होत मन”.. त्या मानसिक अवस्थेत तिला काही सुचलच नाही.. आपल्या मनातील सर्व भावना तिने मोठ्या विश्वासाने मैत्रिणीला सांगितल्या आणि ती मोकळी झाली..

थोड्यावेळाने

एक फोन वाजला
अगं ऐक ना, तुला एक ब्रेकिंग न्यूज देते

शेखर अंबेकर, आदई

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.