Press "Enter" to skip to content

संचित

संचित

असे वाटते इकडे तिकडे
पिसासम त्या उडत जावे

जाणिवांपासून मुक्त व्हावे
रिक्त होऊन असे तरंगावे

ना कुठले ध्येय ना आशा
डौलात उडावे हीच मनीषा

असंख्य पिसे आठवणींची
अलगद द्यावी करून मोकळी

तुझ्या करात मी सुरक्षित
हेच बहुदा माझे संचित…

सौ. मधुरा राजेंद्र काळे, खारघर

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.