Press "Enter" to skip to content

उरण ONGC येथील बंद पोलिस कॉलनी येथे कोविड सेंटर सुरू करावे

राष्ट्रवादी सरचिटणीस दिपक माळी यानी केली पालक मंत्री अदिती ताई तटकरे यांच्या कडे मागणी

सिटी बेल । उरण । सुनिल ठाकूर ।

उरण शहर तसेच आजुबाजुचे परिसरातील किंबहूना ओ. एन. जी. सी. प्रकल्पग्रस्त गावात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता उरण ओ,एन,जी,सी एन जी एल गेट शेजारी बंद असलेल्या ईमारती कोवीड केअर सेंटर बनवुन वापरात आणने करीता ओ.एन.जी.सी.ने कारवाई होणेबाबत राष्ट्रवादी चे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, उरण विधान सभा महिला अध्यक्षा सौ .भावना ताई घाणेकर यांच्या मार्गदर्शना खाली राष्ट्रवादी सरचिटणीस दिपक माळी यांनी पालक मंत्री अदिती ताई तटकरे यांच्याकडे निवेदन देऊन मागणी केली आहे.

ह्या निवेदना द्वारे विनंती करण्यात येते की कोवीड-१९ हया महामारीने संपूर्ण राज्या मधे थैमान घातला असताना महाराष्ट्र राज्य शासन कोरोना चा प्रादुर्भाव वाढु नये महणून मोठ्या प्रमाणावर उपाययोजना करते ,उरण शहर व शहराबाजुची गावे हया कोवीड-१९ पासुन ग्रस्त असुन उरण शहर औदयोगीक वसाहत असल्याने दैनदिन कोरोनाग्रस्त पेशंट वाढत आहेत तसेच गेले काही दिवसात अनेक तरूण शहराने गमावले असताना शहराजवळच केअर पॉईंट कोवीड सेंटर एकमेव असुन त्यावर मोठा ताण निर्माण होत असुन ओ,एन,जी,सी प्रकल्पकरिता ज्या नागाव,म्हातवली,चाणजे ,केगाव गावांनी आपल्या जमीनी दिल्या ज्यावर आज प्रकल्प उभा असुन एक सामाजिक बांधिलकी व दातृत्व म्हणुन उरण मधील कोरोनाग्रस्त पेशंट वर उपचार आणी विलीगीकरण करून होत असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव आटोकयात आणने करिता ओ,एन,जी,सी प्रकल्प शेजारी एन,जी,एल गेट जवळच ओ,एन,जी,सी च्या मालकीच्या जुन्या ईमारतींमधे काही कोरोना पेशंट वर तत्काळ उपचार करणे तसेच कोवीड केअर सेंटर ची ऊभारणी करून तशी कार्य वाही होणेकरीता जेणेकरुन ह्या महामारीवर नियंत्रण मिळवून त्याचा प्रादुर्भाव आटोक्यात आणने सुलभ होउन उरण शहरातील कोरोना ची वाढती संख्या लक्षात घेउन आपण उरण ओ,एन,जी,सी प्रशासनास तसे सुचीत करुन अंमल होणे करीता निर्देश द्यावेत असे निवेदनात म्हटले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.