Press "Enter" to skip to content

95 वर्षाच्या आजोबांनी कोरोनाला हरवले !

95 वर्षाचे “यंग” पोहरी सिंग 14 दिवसांच्या उपचारानंतर ठणठणीत बरे होऊन घरी परतले

सिटी बेल । कळंबोली ।

पनवेल मध्ये करोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यात वयोवृद्धांची संख्या मोठी आहे. असे असले तरी आपल्या इच्छा शक्तीच्या जोरावर अनेकजण बरे होऊन घरी परतले आहेत. नुकतंच एका ९५ वर्षांच्या पोहरी सिंग या यंग स्टार ने करोनावर यशस्वी मात केली आहे. अवघ्या १४ दिवसांत योग्य ते उपचार घेतल्यानं त्यांना कळंबोली मधील कोविड सेंटर मधुन डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पनवेल महानगरपालिका क्षेत्रा मधील खांदा कॉलनी या वसाहती मध्ये राहणाऱ्या या वयोवृद्ध वेक्तीचा ८ एप्रिल रोजी करोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यासोबत कुटुंबातील एका व्यक्तीला संसर्ग झाला होता. उपचारांसाठी त्यांना कळंबोली मधील कोविड सेंटर मध्ये दाखल करण्यात आलं होतं.

नगरसेवक रवींद्र भगत आणी हाॅस्पीटल कर्मचार्‍यांनी टाळ्या वाजवून दिला निरोप

आज कळंबोली कोविड सेंटर या ठिकाणी पोहरी सिंग या ९५ वर्षांचा वयोवृद्ध यंग स्टार आज कोरोना पासून मुक्त होऊन घरी जात असताना त्या ठिकाणी असलेले डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी टाळ्या वाजवून अभिनंदन केले.

खरंच या पेशंटला पाहत असताना गेले १० दिवस मी सातत्याने कोविड सेंटर मध्ये जात असताना जे मनाला वाटत होतं की खरंच आज कोरोनाचा संसर्ग सुरु झाल्यापासून एक प्रश्न निर्माण होत होता ही कोरोनाच्या संसर्गामुळे नागरिकचे जीव जात आहे. की आता फेसबुक, सोशल मीडिया, सातत्याने नागरिकांमध्ये होत असलेल्या कोरोनाची चर्चा करत असताना भीती माणसाच्या मनात हृदयात भीतीपोटी आपला जीव गमावत आहेत.आज त्याच प्रश्नाचे उत्तर मला मिळाले आहे. की नागरिकांच्या मनात जी भीती निर्माण झालेली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. मी नागरिकांना आव्हान करेल की कोरोनाला घाबरुन जाऊ नका कोरोना चा संसर्गमुळे आपल्या जीवाला धोका होतो. त्याच्यापेक्षा कित्येक पटीने जास्त आपला जीव भीतीपोटी जात आहे. त्याच्यामुळे कोरोना ला घाबरुन न जाता महाराष्ट्र सरकारने जे निर्बंध दिलेले आहेत त्याचे तंतोतंत पालन करुन आपल्या मनातील भीती आहे. ती पूर्णपणे बाहेर काढून टाका. कोरोना हा संसर्गजन्य रोग असला तरी तो इतर आजारासारखा रोग आहे.आपल्या आयुष्यात राहणार आहे असं मला वाटतं आणि त्यासोबत आपल्याला जगायचं सुद्धा आहे. आज जर पोहरी सिंग ह्या ९५ वर्षाचा यंग स्टार कोरोना वर मात करु शकतो तर आपल्या मनातील भीती निघाली तर शंभर टक्के आजार पूर्णपणे घरच्या घरीच बरा होऊ शकतो.

त्यामुळे आपल्या मनातील पूर्णपणे भीती काढून टाकावी एवढीच हात जोडून नागरिकांना नम्रतेची विनंती आहे.

नगरसेवक रवींद्र भगत

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.