Press "Enter" to skip to content

रस्त्यालगत वणवा देत आहे अपघाला निमंत्रण

वणव्यामुळे पक्ष्यांचे घरटे,गुरांचा चारा, जंगलातील रानमेवा संकटात

सिटी बेल । काशिनाथ जाधव ।
पाताळगंगा ।

रणरणत्या उन्हात वणवा पेटविण्याच्या मानवी वृत्ती मध्ये वाढ झाली असून डोंगराच्या समवेत रस्त्यालगत वणवा पेटविल्याने रस्त्यावर आपघाताला निमंत्रण मिळत आहे.दर वर्षी पावसाळा संपताच माळरानावर मोठ्या प्रमाणात गवत निर्माण होत असते.हेच गवत गुरांचे अन्न निर्माण होत असल्यामूळे गुरांच्या चा-यांचा प्रश्न मार्गी लागत आहे.मात्र माळरानावर वनवे लागत असल्यामुळे चा-याचा प्रश्न गंभिर बनत चालला असताना, या गवतावर कोणी अज्ञात व्यक्ती पेटून दिले जाते.आणि त्याचे वणव्यात रूपांतर होते.

या वणव्यामुळे पक्ष्यांचे घरटे,गुरांचा चारा औषधी वनस्पती,प्राणी तसेच आता जंगलातील तयार झालेला रानमेवा या वणव्यात जळून खाक होत असल्याचे दुर्देवी चित्र अनेक ठिकाणी पहावयास मिळत आहे.सध्या जंगलात रानमेवा तयार होत.परंतू रणरणत्या उन्हामध्ये हा वणवा लागल्या येथील परीसर असह्य होवून जात आहे.

वणवा लावण्याच्या प्रवृत्ती ला बंधने घालणे अत्यंत आवश्यक आहे.कारण वणवा मुळे आदिवासी यांच्या रोजगारला खिल बसत आहे.जंगलात अनेक प्रकारचा रानमेवा तयार झाल्यामुळे यांच्या वरती अदिवासीच्या कुटुंबांचा उदार निर्वाह होत असतो.मात्र विचित्र संकल्पने मुळे हा वणवा लावात आहे.वणवा लावून काय मिळते कुणास ठाउक ? मात्र पर्यावरणाचा समतोल ठासळत चालाला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.