Press "Enter" to skip to content

विविध विकासकामांसाठी 10 लक्ष निधी मंजूर कामांचे भूमिपूजन संपन्न

सिटी बेल । कर्जत । संजय गायकवाड ।

रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या माध्यमातून जिल्हापरिषद निधीतून मौजे नेवाळी तर्फे वासरे येथील विविध विकासकामांसाठी 10 लक्ष निधी मंजूर कामांचे भूमिपूजन संपन्न झाले.

कर्जत तालुक्यातील बीड ग्रामपंचायत हद्दीतील मौजे-नेवाळी तर्फे वासरे येथील आदिवासी बांधव व ग्रामस्थ यांच्या मागणीनुसार अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या मौजे नेवाळी आदिवासी वाडी येथे 5 लक्ष रुपये खर्च करून सामाजिक सभागृह बांधणे. तसेच मौजे-नेवाळी येथील स्मशानभूमी दुरुस्ती व निवारा शेड बांधणेसाठी 5 लक्ष रुपये मंजूर झाले आहेत.

या विविध कामांचे भूमिपूजन ग्रामस्थ भालचंद्र बेलोसे, प्रकाशबुवा मालुसरे, केतन बेलोसे, गोपाळ तात्या, रामा तात्या, प्रकाश जाधव, प्रदीप लाड, प्रशांत मालुसरे, उपसरपंच विराज बेलोसे, महेंद्र ढोले, प्रशांत महाडिक, ज्ञानेश्वर कदम, शरद महाडिक, प्रवीण (भाई ) महाडिक, भूषण बेलोसे, प्रीतम सरोते, कुंडलीक पालकर, संजय ढोले, मयूर सरोते यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले, दिलेला शब्द पुरे करणारे राजिप उपाध्यक्ष सुधाकर घारे यांसकडून नेवाळी गावातील विविध विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध देण्यात आला त्याबद्दल नेवाळी ग्रामस्थानच्या वतीने मनपूर्वक आभार मानले आहेत..

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.