Press "Enter" to skip to content

होम क्वारंटाईन कोवीड रुग्ण ठरत आहेत सुपर स्प्रेडर..! सारिका माळी शिंदे

सिटी बेल । रायगड । अमूलकुमार जैन ।

प्रशासनाच्या नियमानुसार होम क्वारंटाईन केलेली कोवीड-१९ रुग्ण हे १४ ते १७ दिवस सामान्य लोकांच्या संपर्कात नाही आली पाहिजे. परंतू *होम क्वारंटाईन केलेले कोवीड-१९ पेशंट ५ ते ७ दिवसात बाहेर पडुन सुपर स्प्रेडर ठरत आहेत. असल्याचे मत समाजवादी पक्षाच्या मुरुड तालुका महिला अध्यक्षा सारिका माळी शिंदे यांनी व्यक्त केले.

हे सुपर स्प्रेडर स्वतःच्या परिवारासाठी आणि समाजासाठी सुध्दा घातक होत चालले आहेत.कोवीड-१९ बाधित रुग्ण हा१२ ते १४ दिवस सामान्य निरोगी व्यक्तीस संसर्ग पसरवु शकतो. असे असून देखील बरेचसे कोवीड-१९ पेशंट हे,मला काही लक्षणं नाहीत,मी आता बरा आहे,मला काहीच त्रास नाही होत,मला दम पण नाही लागत,माझं सॅच्युरेशन (ऑक्सिजन पातळी) ही नाॅर्मल आहे.अशी कारणं सांगत ५ ते ७ दिवसात घराच्या बाहेर पडुन प्रशासनाचे सर्व नियम धाब्यावरबसवून सुपरस्प्रेडर बनत आहेत.

प्रशासनाला, सरकारला दोष देत बसण्यापेक्षा आपण प्रशासनाला काय मदत करु शकतो हा विचार करा. सरकार, प्रशासन त्याच्या पातळीवर पुर्ण पणे काम करतंय, आपण सुजान नागरिक म्हणून प्रशासनाच्या पुर्ण पणे पाठीशी उभं राहिलं पाहिजे.

होम क्वारंटाईन कोवीड-१९ बाधितअसलेल्या प्रत्येक व्यक्तीने आपली सामाजिक जबाबदारी व प्रशासनाला मदत म्हणुन खारीचा वाटा उचलत आपला १४ ते १७दिवसांचा होम क्वारंटाईन कालावधी घरात राहुन पुर्ण केला पाहीजे, जेणेकरून तुम्ही सुपर स्प्रेडर ठरणार नाही.यासाठी काळजी घेणे गरजेचे असल्याचे समाजवादी पक्षाच्या मुरुड तालुका महिला अध्यक्षा सारिका माळी शिंदे यांनी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.