Press "Enter" to skip to content

महाराष्ट्र सरकारचा कारभार आयजीच्या जिवावर बायजी उदार !
ॲड रेवण भोसले



सिटी बेल । उस्मानाबाद ।

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनमध्ये एक महिना गरिबांना प्रति व्यक्ती 3 किलो गहू व 2 किलो तांदूळ द्यायची घोषणा केली परंतु अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी लगेच केंद्र सरकारकडे गहू व तांदळाची मागणी केली, त्यामुळे महाराष्ट्र सरकार कडून कसलीही मदत न देता केंद्र सरकारच्या योजनेतीलच मदत जाहीर करून मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेची दिशाभूल व फसवणूक करून महाराष्ट्र सरकार हे आईजीच्या जीवावर बायजी उदार असल्यासारखेच काम करत असल्याची पुन्हा प्रचिती आणून दिली असल्याची टीका जनता दल सेक्युलर पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा प्रवक्ते ॲड रेवण भोसले यांनी केली आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधाने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी शेजारील कर्नाटक सरकारने शेतकरी, लघु, कुटीर आणि मध्यम उद्योग, हातमाग कामगार, फुलांची शेती करणारे, धोबी ,न्हावी ,आटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांसह अन्य घटकांना लॉकडाऊन मध्ये भरघोस मदतीचे पॅकेज देण्याची घोषणा केली आहे. याबरोबरच कर्नाटक सरकारने 11 टक्के उत्पादन शुल्कात वृद्धि करण्याचीही घोषणा केली आहे. ही टक्केवारी अर्थसंकल्पात घोषित करण्यात आलेल्या सहा टक्क्यांच्या वाढी व्यतिरिक्त असणार आहे.

या पॅकेज अंतर्गत फुलांची शेती करणाऱ्या शेतकऱ्याला प्रतीहेक्‍टर 25 हजार रुपये इतकी मदत मिळणार आहे तर धोबी आणि केसकर्तनालयधारकांना प्रत्येकी 5 हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. ऑटो आणि टॅक्सी चालकांना एकदाच पाच हजार रुपये दिले जातील .बांधकाम व्यवसायात असलेल्या मजुरांना 3 हजार रुपयांची मदत मिळणार आहे, या मजुरांना या अगोदर 2 हजार रुपयाची मदत देण्यात आलेली आहे. दिल्ली सरकारही गोरगरीब, हातावर पोट असणारा वर्ग, मजूर या सर्वांना कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासंदर्भात लादण्यात आलेल्या कडक् निर्बंधकालावधीत मदत करत आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार मधील मंत्री दररोज महाराष्ट्रातील जनतेला कोरोना काळात सर्व आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याऐवजी महाराष्ट्रातील जनतेची थापा मारून दिशाभूल करण्यातच मग्न आहेत, त्यातच कोरोना संसर्गाला रोखण्याच्या नावाखाली कडक निर्बंध लादून महाविकास आघाडीतील मंत्रीच अधिकाऱ्यामार्फत शेकडो कोटीची वसुली करून महाराष्ट्राचे वाळवंट करण्यातच धन्यता मानत असल्याचे आरोपही ॲड भोसले यांनी केला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.