Press "Enter" to skip to content

धक्कादायक : पनवेल महानगरपालिका क्षेत्रात आज 13 जणांचा कोरोनाने मृत्यू

सिटी बेल । पनवेल ।

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच चालला असून कोरोनाची ही दुसरी लाट अनेकांच्या जीवावर बेतत आहे.

आज पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोरोनाने तब्बल 13 जणांचा बळी घेतला आहे. आज दिवसभरात 583 नवीन रुग्ण सापडल्याने चिंतेत आणखी भर पडली आहे.

दरम्यान शासनाने कोरोना रोखण्यासाठी नागरीकांवर अनेक निर्बंध घातले असले तरी स्थानिक पातळीवर प्रशासन मात्र निर्बंधांव्यतीरीक्त आणखी काही करताना दिसत नाही.

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात महापालीकेने फक्त नागरीकांच्या माथी खापर फोडण्यात धन्यता मानली परंतु प्रत्यक्षात मात्र महापालीका प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना करण्यात येत नाहीत. इतक्या दिवसात महापालीकेने साधी फवारणी देखील केली नाही. आधी सुरू केलेले कोव्हीड सेंटर सध्या बंद अवस्थेत आहेत. येथील रूग्णांना महानगरपालिकेने खाजगी रुग्णालयांच्या हवाली करून आपले हात वर केले आहेत. त्यामुळे या खाजगी रुग्णालयांची बिले भरुन या रूग्णांचे खिसे रिकामे होत आहेत.

थोडक्यात पनवेल महानगरपालिका प्रशासनाचे वागणे म्हणजे “दुसर्‍यास सांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण” असेच असल्याचे दिसून येत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.