Press "Enter" to skip to content

प्रसादभाई सावंत यांनी स्वखर्चाने पुन्हा उपलब्ध केले १२ रेमडीसीवर इंजेक्शनस

सिटी बेल । माथेरान । मुकुंद रांजाणे ।

दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना अनेकांना वेळेनुसार रेमडीसीवर इंजेक्शनस कोविड रुग्णाकरिता उपलब्ध होत नव्हती यासाठी अगोदरच एकूण सात इंजेक्शन दोन दिवसांपूर्वी शिवसेना गटनेते तथा बांधकाम सभापती प्रसादभाई सावंत यांनी स्वखर्चाने आणि माजी नगराध्यक्ष विवेक चौधरी यांच्या मदतीनेउपलब्ध करण्यात आली होती परंतु पुन्हा काही रुग्णांना या इंजेक्शनची आवश्यकता भासल्याने ताबडतोब आज दि.१५ रोजी प्रसादभाई सावंत यांनी स्वखर्चाने १२ रेमडीसीवर इंजेक्शनस नगरपरिषदेच्या दवाखान्यात पुन्हा उपलब्ध करून दिली आहेत.

जगभर थैमान घातलेल्या कोविड या महामारीच्या रोगाने माथेरान मध्ये देखील डोकं वर काढले असून रोजच्या रोज माथेरान मध्ये चार ते पाच कोविड रुग्णांची भर पडत आहे, अशातच ऑक्सिजन ची पातळी कमी झाल्यावर सदर रुग्णांवर उपचार करण्यासाठी रेमडेसिव्हर या इंजेक्शन ची गरज लागत असून सदर इंजेक्शन च्या तुटवड्या मुळे माथेरानमधील कोविड रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक हवालदिल झाले आहेत.

अशातच गेल्या काही दिवसांपूर्वी देखील गटनेते ,बांधकाम सभापती मा श्री प्रसादभाई सावंत यांनी स्वखर्चाने सात इंजेक्शन *माजी नगराध्यक्ष विवेकभाई चौधरी यांच्या मदतीने माथेरान मधील कोविड रुग्णाकरिता उपलब्ध करून दिली होती.

त्यामुळे कोविड रुग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त करून दोघांचे आभार व्यक्त केले आहे.
तसेच माथेरान मधील तिन्ही वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत यादव, डॉ प्रांजल सिंग, डॉ उदय तांबे तसेच फार्मासिस्ट सदानंद इंगळे, नर्स सौ गोळे, कर्मचारी दिघे, कु रेश्मा काळे ,कु प्राजक्ता शिंदे, वॉर्ड बॉय राजू वाघेला, रमेश सकपाळ आणि सर्व हॉस्पिटल कर्मचारी , सर्व रुग्णवाहिका चालक हे कोविड रुग्ण लवकर बरे होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत आणि रुग्णांना सेवा देण्यासाठी मनापासून योग्य पद्धतीने उपचार देत आहेत त्यामुळे माथेरान मधील रुग्णांचा रिकव्हरी रेट खूपच समाधानकारक आहे.

माथेरानच्या कर्तव्यदक्ष, कार्यसम्राटआणि शिस्तबद्ध नगराध्यक्षा मा प्रेरणा सावंत या देखील कोविड आणि आरोग्य सेवेबाबत स्वतः जातीने बारीक लक्ष ठेवून आहेत तसेच त्यांच्या कडून आरोग्य सेवा अधिक चांगल्या दर्जाची देण्यासाठी वेळोवेळी सूचना देण्यात येत आहेत तसेच *उपनगराध्यक्ष मा श्री आकाश चौधरी, मुख्याधिकारी मा डॉ प्रशांत जाधव, सर्व नगरसेवक नगरसेविका, कर्मचारी वृंद हे देखील आपले कर्तव्य प्रामाणिक पणे पार पाडत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.