Press "Enter" to skip to content

“अक्षमंच काव्यसंग्रह भाग-१” चा ऑनलाइन प्रकाशन सोहळा संपन्न

सिटी बेल । रोहा-रायगड । नंदकुमार मरवडे ।

अष्टपैलु संस्कृती कला अकादमी मुंबई व मासिक वृत्तपत्र ” न्यायप्रभात ” यांच्या संयुक्त विद्यमाने अक्षरमंच काव्यसंग्रह भाग-१,या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा दिनांक १३ एप्रिल २०२१ ,चैत्र शुद्ध प्रतिपदा,श्री शालिवाहन शके १९४३, मराठी नववर्षदिन गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर अत्यंत उत्साहाने संपन्न झाला.

सदर काव्यसंग्रहामध्ये महाराष्ट्र राज्यासह इतर राज्ये व परदेशातील सुद्धा, साहित्यक्षेत्रातील एकूण ७३ नवोदित कवी-कवयित्रींनी सहभाग नोंदवला असून,वाचनीय अशा विविध विषयांच्या सुमारे ८२ उत्कृष्ट कवितांचा समावेश या काव्यसंग्रहात आहे.

काव्यसंग्रहाच्या निर्मिती आणि प्रकाशनाचे काम करणारे समिती संयोजन प्रमुख-श्री शिवाजी खैरे सर
(संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष व संपादक-मा.वृत्तपत्र ” न्यायप्रभात “)सहाय्यक-सौ.अनुसया खैरे मॅडम(सहसंपादक-मा.वृत्तपत्र”न्यायप्रभात “),तसेच काव्यसंग्रह संपादक मंडळातील :- प्रा.श्री नागेश हुलवळे-डोंबिवली ,प्रा.अक्षय पवार-अहमदनगर ,सौ.राजश्री मराठे-हैदराबाद,सौ.प्रतिमा काळे-पुणे,सौ.सविता पाटील-जळगाव,सौ.सुरेखा नाईक-कोल्हापूर,सौ.रुपाली काळे-पुणे,सौ.सुनिता वावधाने -नांदेड,सौ.अनुष्का गोवेकर -कोल्हापूर,या सर्वांनी विशेष सहकार्य केले.

काव्यसंग्रह प्रकाशन कार्यक्रमाला,जेष्ठ किर्तनकार व प्रवचनकार महंत ह.भ.प.प्रल्हाद सुपेकर महाराज, चित्रपट अभिनेते गझल गीतकार लेखक कवी श्री अजय बिरारी,महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ अहमदनगर जिल्हाध्यक्ष श्री बापूसाहेब तांबे,चित्रपट कथालेखक व कवी श्री भानुदास पानमंद,या व्यक्ती प्रमुख अतिथी म्हणून लाभल्या व त्यांनी आपल्या भाषणांतून साहित्य व कला विषयक उत्तम प्रबोधन केले.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला संस्थाध्यक्ष व प्रमुख अतिथींनी दिपप्रज्वलन केले.कुमारी तृप्ती खैरे व कुमार निषाद खैरे या दोन बालकलावंतांनी व सौ.अनुसया खैरे मॅडम यांनी मधुर स्वरात ईशस्तवन सादर केले.संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संपादक व संगीतकार श्री शिवाजी खैरे सर यांनी स्वागत गीतातून अथितींचे स्वागत करुन संगीतमय वातावरणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्यासह इतर राज्यातील तसेच परदेशातील एकूण २३ नवोदित कवी-कवयित्रींनी आपल्या स्वरचित कविता अतिशय उत्तम प्रकारे सादर केल्या.अक्षरमंच काव्यसंग्रह संपादक मंडळातील सर्व सदस्यांनी आपल्या मनोगत मधून अक्षरमंच काव्यसंग्रह प्रकाशनाचे व संस्थेच्या साहित्य-उपक्रमांत काम करताना आलेल्या अनुभवांचे काव्यसुमनांमधून ऋणनिर्देश व्यक्त करुन सर्व सारस्वतांना आपल्या साहित्य कलेचे उत्तम दर्शन घडविले.

अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष आदरनीय बापूसाहेब तांबे साहेब यांनी या ऑनलाइन कार्यक्रमासाठी संघटनेची झूम अ़ॅप वापरण्यास देण्याचे विशेष सहकार्य केले.
कवयित्री व शिक्षिका चंदनताई तरवडे मॅडम आणि अष्टपैलू संस्कृती कला अकादमी या संस्थेच्या सांस्कृतिक व साहित्यिक मंडळाच्या अधिकृत सदस्या कवयित्री शिक्षिका प्रतिमाताई काळे मॅडम यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अतिशय उत्तम प्रकारे केले.ऑनलाइन कार्यक्रमाचे नेटवर्क हाताळण्याचे कार्य प्रा.श्री अक्षय पवार सर यानी अतिशय उत्तम प्रकारे केले. संस्थेचे पदाधिकारी व मासिक वृत्तपत्र न्यायप्रभातचे नवीमुंबई जिल्हा प्रतिनिधी लेखक कवी व शिक्षक प्रा.श्री नागेश हुलवळे सर यानी आभाररुपी उत्तम काव्यसुमने अर्पित केले व कुमारी तृप्ती खैरे हिने सुमधुर स्वरात पसायदान सादर करून या अक्षरमंच काव्यसंग्रह प्रकाशन कार्यक्रमाची सांगता झाली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.