Press "Enter" to skip to content

कर्जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

329 रक्तदात्यांनी केले रक्तदान

सिटी बेल । कर्जत । संजय गायकवाड ।


कोरोना जागतिक महामारी ची दुसरी लाट संपूर्ण राज्यात पसरली आहे. रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असून परिस्थिती चिंताजनक झाली आहे. राज्यात मोठ्या प्रमाणावर रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्याकरिता सर्व कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले होते.

रायगड जिल्हा अध्यक्ष माजी आमदार सुरेश लाड यांनी खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्यात स्थानिक स्तरावर रक्तदान शिबिरे आयोजित करण्याच्या सूचना केल्या होत्या. आज दि. 12 एप्रिल रोजी कर्जत तालुक्यात विविध ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. कर्जत तालुक्यात दहिवली, मार्केवाडी, नेरळ, डिकसळ व कशेळे येथे अशा राक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. दहिवली -150, नेरळ – 36 मार्केवाडी – 35, कशेळे -33, डिकसळ -75 अशा 329 रक्तदात्यांनी रक्तदान करून कोरोना काळात रक्तदानाचा उच्चांक प्रस्थापित केला.

खासदार सुनील तटकरे यांनी जिल्हाध्यक्ष सुरेश लाड यांच्या समवेत दहिवली येथील राष्ट्रवादी भवन मधील शिबिरास भेट देऊन समाधान व्यक्त केले. तसेच कोरोना काळात रक्तदात्यांनी चांगला प्रतिसाद दिल्याच्या भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर घारे, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष सुरेश टोकरे, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ धुळे, जिल्हा सरचिटणीस तानाजी चव्हाण, माजी नगराध्यक्ष शरद लाड, कर्जत शहराध्यक्ष नंदू लाड, पंचायत समिती सदस्य रवींद्र देशमुख, माजी नगराध्यक्ष राजेश लाड, नगरसेविका पुष्पा दगडे, भारती पालकर, महिला उपाध्यक्ष पुजा सुर्वे, खादी ग्रामोद्योग चे चेअरमन शंकर भुसारी, प्रगतिशील शेतकरी विनय वेखंडे, नरेश भोईर, वेणगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच देविदास बडेकर, माजी सरपंच रमेश कांबरी, जगदिश ठाकरे, भानुदास मिसाळ आदी कार्यकर्ते उपस्थित होते. सार्वजनिक रक्तदाता राजाभाऊ कोठारी यांनी नियोजन करून यासाठी मोलाचे सहकार्य केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.