Press "Enter" to skip to content

स्पर्श

स्पर्श

विधात्याने निर्मिली
अद्भुत शक्ति जगात
शब्दांच्या पलिकडचे
सांगता येते स्पर्शात

स्पर्शच जातो बोलुनी
मनातील सर्व काही
शब्दांची तेथे मुळी
गरजच पडत नाही

वात्सल्याचा ममतेचा
स्पर्श जाणवे माऊलीचा
अडचणीच्या काळात
धीराचा स्पर्श पित्याचा

प्रेमाचा विश्वासाचा
स्पर्श जोडीदाराचा
हक्काचा समजुतीचा
स्पर्श असतो मैत्रीचा

आशिर्वाद रुपी मिळतो
स्पर्श तो गुरु कृपेचा
भवसागर पार करण्या
परिसस्पर्श हवा भगवंताचा

वैशाली केतकर, नवीन पनवेल

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.