Press "Enter" to skip to content

वेळ

कुठे कधी कशी केव्हा अलवार मनात येऊन गेली
तुझ्या-माझ्या सोबतीची याद ती येऊन गेली

कोण कुठला कसा होतो एक प्रश्न मनात होता
अलवारपणे हासत जाता उत्तर ते देऊन गेली

पहाटेच्या गारव्याला पांघरून तो घेत होता
शेकोटीच्या उबेमधली उष्णता ती स्मरून गेली

भेटीमधल्या क्षणांचाही पसा तो भरला होता
कुठे गेली कशी गेली विरहात ते सांगून गेली

चाहूल तुझी लागता वाटेकडे तो पाहत होता
सांजावताना वेळ ती दुरावा तो बोलून गेली

अशाच त्या समयालाही प्रश्न तो विचारत होता
अनपेक्षित असे काही आठवून ती वेळ गेली

स्वानंद नंदकुमार मराठे, पुणे

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.