Press "Enter" to skip to content

गोव्याच्या दारूने भरलेली इरटीका कार जप्त

सिटी बेल । पनवेल । संजय कदम ।

राज्य उत्पादन शुल्क , भरारी पथक क .२ , पनवेल यांना खात्रीलायक बातमी मिळाल्या वरुन दि . ०७/०४/२०२१ रोजी ठिक २०.३० वाजता मौजे निलकंठ स्वीट समोर , सेक्टर २० , खारघर , ता . पनवेल , जि . रायगड येथे गोवा राज्य निर्मित विदेशी मद्याच्या वाहतुकीवर पाळत ठेवून छापा घालत असताना एक पांढ – या रंगाची मारुती सुझुकी कंपनीची ईरटीगा ZXI कार एम एच ४६ ए एल ४४५३ नंबर मधून गोवा निर्मित विदेशी मद्याच्या ३६४७५० मि . ली . क्षमतेच्या , १२४३७५ मि . ली . क्षमतेच्या , १ ९ ४१८० मि . ली . क्षमतेच्या , ४५६x५०० मि . ली . क्षमतेचे स्ट्रॉग बिअरचे सिलबंद कॅन व एक अॅपल कंपनीचा 4s आयफोन मोबाईल सिमकार्ड सहीत जप्त केले आहेत.

सदरील आरोपी १ ) मुलावरअली रोजनअली शेख वय ४६ वर्षे रा . रुम नं .१००१ , केसेंट हायलाईट , सेक्टर ३५ डी , प्लॉट नंबर ४ , खारघर , ता . पनवेल , जि . रायगड . २ ) वाजिद नुर सय्यद वय २४ वर्षे रा . बिरोबा रोड , कालीका नगर , डॉक्टर वपे हॉस्पिटल , मु . / पो . शिर्डी , ता . राहता , जि . अहमदनगर . ३ ) साईनाथ श्रीमंत पटाले वय २ ९ वर्षे रा . बिरोबा रोड , कालीका नगर , डॉक्टर वपे हॉस्पिटल , मु . / पो . शिर्डी , ता . राहता , जि . अहमदनगर . या तिन्ही आरोपीस अटक करुन त्यांच्या ताबेकब्जात रुपये ५,८७,८३० / – किमंतीचा मुद्देमाल जप्त केला .

सदर कारवाई कांतीलाल उमाप आयुक्त राज्य उत्पादन शुल्क , महाराष्ट्र राज्य मुंबई , श्रीमती . उषा राजेंद्र वर्मा संचालक ( अंमलबजावणी व दक्षता ) राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई , सुनिल चव्हाण विभागीय उपआयुक्त राज्य उत्पादन शुल्क कोकण विभाग ठाणे , श्रीमती . किर्ती शेडगे , अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क रायगड- अलिबाग , विश्वजीत देशमुख उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क रायगड – अलिबाग , यांचे मार्गदर्शनाखाली आनंदा कांबळे ( निरीक्षक विभागीय भरारी पथक ठाणे ) एस . एस . गोगावले ( निरीक्षक ) , अविनाश रणपिसे ( निरीक्षक ) , एस . एस . गायकवाड ( दुय्यम निरीक्षक ) , ए . सी . मानकर ( दुय्यम निरीक्षक ) , तसेच पालवे , संदीप पाटील , हाके ( जवान – नि – वा . चालक ) डी . डी . पोटे ( जवान ) , एस . ए . मोरे ( जवान ) तसेच विभागीय भरारी पथक ठाणे यांचा स्टाफ आजगावकर ( जवान ) , अविनाश जाधव ( जवान ) , दिपक घावटे ( जवान ), गिते ( जवान ) व सदानंद जाधव ( जवान – नि – वा . चालक ) यांनी भाग घेतला . तसेच सोबत मनोज अनंत भोईर व अनंत दत्तु जगदाडे यांनी मदत केली .

या गुन्हयाचा पुढील तपास श्रीमती . किर्ती शेडगे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क रायगड यांचे मार्गदर्शनाखाली शिवाजी गायकवाड दुय्यम निरीक्षक हे करत आहेत .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.