Press "Enter" to skip to content

नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांची कार्यपध्दती कौतुकास्पद : सुवर्णा जोशी

सिटी बेल । माथेरान । मुकुंद रांजाणे ।

माथेरान सारख्या दुर्गम भागात मोटार वाहनांना बंदी असताना केवळ मानवी शक्तीने मालवाहतुक केली जाते. कुठल्याही प्रकारची यांत्रिक पद्धतीने सुविधा नसताना सुद्धा अनेक विकासकामे पूर्णत्वास नेणे म्हणजे खरोखरच एक अग्निदिव्य असून एकंदरीत अवघ्या चार वर्षाच्या कार्यकाळात आपल्या परीने अशक्य ते शक्य करून जी जी महत्वपुर्ण लोकाभिमुख विकासकामे मार्गी लावण्यासाठीझटत असणाऱ्या माथेरानच्या कार्यकुशल नगराध्यक्षा तथा एक उत्तम प्रशासक म्हणून ज्यांच्याकडे आदराने पाहिले जाते त्या आमच्या तालुक्यातील अग्रगण्य व्यक्तिमत्व असणाऱ्या आमच्या सहकारी प्रेरणा प्रसाद सावंत यांची आजवरची कार्यपद्धती खरोखरच कौतुकास्पद असून अन्य राजकीय पक्षांच्या मंडळींसाठी एक आदर्श असल्याचे मत कर्जतच्या विद्यमान नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी व्यक्त केले आहे.

माथेरानला धावती भेट देऊन त्यांनी शिवसेनेच्या प्रसादभाई जनसंपर्क कार्यालयास आवर्जुन भेट दिली त्यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कर्जत तालुक्यातील माथेरान हे सर्वांचे आवडते पर्यटनस्थळ असून देशविदेशातील पर्यटकांना हे ठिकाण नेहमीच भुरळ घालत असते. माथेरानच्या प्रवेशद्वारापासून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी नगरपरिषदेच्या माध्यमातून प्रयत्न केले आहेत. तर या ठिकाणी मुख्यत्वे स्वच्छतेवर अधिकाधिक भर दिला गेला असल्याने प्लास्टिक मुक्त माथेरान पहावयास मिळत आहे. माथेरानच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून घेण्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे ही बाब सुध्दा वाखाणण्याजोगी आहे. त्यामुळेच आगामी काळात सुध्दा पक्षाच्या कामांमुळे निश्चितच पुन्हा एकदा नगरपरिषदेवर भगवा झेंडा फडकविला जाईल असा विश्वास सुध्दा सुवर्णा जोशी यांनी व्यक्त केला आहे. त्यासाठी पक्षातील सर्वांनी एकजुटीने आतापासूनच कामाला लागले पाहिजे. मतदार राजा सुध्दा आजपर्यंत होत असणाऱ्या विकास कामाचा आढावा घेऊन शिवसेनेलाच मतदान करेल यात शंका नाही.

यावेळी माथेरानच्या विद्यमान नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांच्या हस्ते शाल देऊन सुवर्णा जोशी यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिवसेनेच्या महिला आघाडी सदस्या तसेच अन्य कार्यकर्त्या मोठया संख्येने उपस्थित होत्या.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.