Press "Enter" to skip to content

मसाल्याचे पदार्थ खरेदी करण्यासाठी गृहीणींची लगबग

सिटी बेल । खांंब-रोहे । नंदकुमार मरवडे ।

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढू लागला आहे.अशा परिस्थितीत सर्वत्र विस्कळीतपणा येऊन जनजिवनावरही त्याचा परिणाम जाणवू लागला आहे. कोरोनामुळे सर्वच बाबतीत आर्थिक कुचंबना झाली असतानाच गृहीणी मात्र पैशांची तजवीज करून वर्षभर लागणारे मसाल्याचे पदार्थ खरेदी करीत असतानाची त्यांची लगबग दिसून येत आहे.

बाजारात मिळणारे विविध कंपन्यांचे तयार मसाले परवडत नसल्याने मिरची खरेदी करून त्याचा मसाला बनविण्यावर ग्रुहीणींचा कल दिसून येतो.त्यामुळे शंकेश्वरी, बेडगी,कश्मिरी, गंटूर,लवंगी, कोल्हापूरी मिरची आदी मिरची खरेदी करणे,त्याचबरोबर धडे,बडीशोप,अख्खा मसाला,जिरे,मोहरी,हळकुंड आदी मसाल्याचे पदार्थ खरेदी करण्यासाठी ग्रुहीणींची एकच लगबग सुरू झाली असल्याचे दिसून येत आहे.

रोहे शहरातील मिरची गल्लीत सध्या मिरची खरेदी करण्यासाठी मोठ्या संख्येने महिला येत असताना दिसत आहेत.तर कोरोना महामारी,अधूनमधून कोसळणारा अवकळी पाऊस,मिरचीचे उत्पादनात होणारी घट आदींमुळे गतवर्षापेक्षा यावर्षी मसाल्याचे विविध पदार्थांसह मिरचीचेही भाव वाढले असल्याचे दिसून येत असले तरी दैनंदिन जीवनात मसाल्याचे पदार्थ व मसाले यांची मोठीच आवश्यकता असल्याने किंमती कितीही जरी वाढल्या तरी मसाल्याचे पदार्थ खरेदी करण्याचा ग्रुहीणींचा उत्साह मात्र कायम आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.