Press "Enter" to skip to content

आरोग्यम् धनसंपदा..

आरोग्यम् धनसंपदा..

जरा काही वर्षे मागे वळून बघितले तर आपले पूर्वज व त्यांची जीवनशैली याचा अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईलच कि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जन्मतः आपले पुर्वज लवकर निजे,लवकर उठे त्यासी आरोग्य संपदा लाभे..या प्रमाणेच त्यांची दिनचर्या असत.
माझे वडील आयुर्वेदिक डॉक्टर होते, त्यामुळे लहानपणापासूनच आयुर्वेदातील ब्रीदवाक्य व दिनचर्या माहीत होती. पण जसे बदलत राहणे हा निसर्गाचा नियम आहे दत्याप्रमाणे कालांतराने हे आता out dated झाले आहे,याचा विसर पडला आहे..
आता सध्याच्या काळात तर या उलट झालयं, *उशीरा निजे,उशिरा उठे त्यास अखंड आजार लाभे..! सगळ्या गोष्टी या भारतीय संस्कृतीला धरुन न ठेवता पाश्चात्य सवयी जशा आहार विहार, राहणीमान व एकुणच जीवनशैली हवीहवीशी वाटू लागली आहे. राहणीमान बदलले तोपर्यंत ठिक आहे पण जेवण व जीवन या दोन्हीही बदलल्याने आपल्या भारतातील ऋतुचक्र व वातावरण ह्या बाहेरच्या जगाच्या वातावरणापेक्षा भिन्न असल्यामुळे..केवळ फॉरवर्ड विचार व संस्कृतीच्या नावाखाली नको त्या गोष्टींचे अनुकरण करणे..व निसर्गाच्या विरुद्ध वागणे ह्याला फॉरवर्ड विचार म्हणूच शकत नाही. माणसाने आपली दिनचर्या नियमित ठेवली तर त्याला कुठलाही प्रकारचा आजार होवू शकत नाही..! त्याचबरोबर प्रतिकार ९शक्ती वाढुन तो कुठल्याही प्रकारच्या वातावरणात राहू शकतो.
मुळात आपली भारतीय संस्कृती व परंपरा आरोग्याच्या दृष्टीने इतकी परिपूर्ण आहे कि,निसर्गाने जणू मानवाच्या आरोग्याचा विचार करूनच सणवाराचे नियोजन तेही ऋतुचक्राप्रमाणे आखले कि, काय असे वाटते.बरोबर आहे ना?
आता हेच बघा ना ..! गेल्या वर्षी पासून या कोरोना विषाणूने जे थैमान घातले , आणि सध्या जी त्रिसूत्री अख्ख्या जगात पाळली जात आहे ती तर आपल्या संस्कृतीने आपल्याला फार पूर्वीपासून दिली आहे, बाहेरुन आल्यावर स्वच्छ हातपाय धुणे, हात जोडून अंतर ठेवून नमस्कार करणे व साधा संतुलित आहार घेणे व १२ महिने कोमट पाणी प्यायले म्हणजे कुठलाही आजार आपल्या पर्यंत यायची हिंमत करणार नाही..!! तुम्हाला माहीत आहे हो, फक्त आपण ती विसरलो होतो, इतकेच ..! चला मग..
आरोग्य संस्कृतीचे करु मिळून पालन..
आरोग्य धनसंपदा मिळेल भरभरून..

सौ. मानसी जोशी.
खांदा कॉलनी.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.