Press "Enter" to skip to content

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील पुरस्कार मिळवीणार्‍या पहील्या महीला

राज्य शासनाचा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील पुरस्कार उरणच्या कृषी अधिकारी क्रांती चौधरी यांना जाहीर

राज्यशासनाच्या “शेतकरी ते थेट ग्राहक विक्री” या संकल्पनेच्या जनक कृषी अधिकारी क्रांती चौधरी

सिटी बेल । उरण । सुभाष कडू ।

राज्यातील कृषी प्रयोगशीलतेला चालना मिळावी यासाठी कृषी सलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना दिल्या जाणाऱ्या विविध कृषी पुरस्कारांची नुकतीच सरकारतर्फे घोषणा करण्यात आली असून. उरण तालुका कृषी अधिकारी म्हणून उल्लेखनीय कार्य करणार्‍या क्रांती चौधरी मोरे या पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे कृषी सेवा रत्न पुरस्कार सन-२०१९-२० च्या मानकरी ठरल्या आहेत. मात्र हा पुरस्कार प्राप्त करणाऱ्या मोरे या पहिल्याच महिला अधिकारी ठरल्या आहेत.

सन-२०१९-२० मध्ये उरणच्या कृषी आधीकारी असताना उरण मधील कृषी पर्यवेक्षक आणि कृषी सहाय्यक यांच्यासह युक्तीने राज्य शासनाच्या योजना यशस्वीपणे राबवून कृषी उत्पन्न वाढविण्यास मोरे यांनी महत्त्वाचे कार्य केले आहे.शेतकरी महिलांना मत्स्यशेतीचे प्रशिक्षण, फळ प्रक्रियेचे प्रशिक्षण देणे या कामासोबतच शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केला. पशुधन आणि शेती यांची सांगड घालून शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी त्यांनी प्रयत्न केला.

अशा अभूतपूर्व लोकोपयोगी आणि निस्वार्थी कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने मानाचा समजला जाणारा पुरस्कार महिला कृषी अधिकारी क्रांती चौधरी मोरे यांना प्रदान करण्यात आला आहे

…..त्यांनी सुरु केलेला शेतीमालाची शेतकरी ते थेट ग्राहक विक्री हा उपक्रम, पुढे राज्यशासनाचा उपक्रम बनला……

कोव्हीड 19 महामारी मुळे प्रस्तावीत बाजारपेठा बंद पडल्यामुळे मोठे आर्थिक नुकसान होणार्‍या शेतकऱ्यांना, त्यांनी मध्यस्थी करुन संपूर्ण स्वतःची बाजारपेठ उभारून अधिक उत्पन्न करण्याचा नवीन मार्ग दाखविला आहे. यावेळी त्यांनी “व्हाट्सअप ग्रुप डिजिटल विपणन संकल्पनेवर” शेतमाल थेट विक्रीसाठी सोसायटी मॉडेल सुरू केले. क्रांती चौधरी यांनी नुसते उत्पादन घेणे म्हणजे शेती नसून विक्री व्यवस्थापनाबद्दल ऑनलाईन प्रशिक्षण व बाजारपेठ उपलब्ध करून शेतकऱ्यांना विक्री बाबत स्वावलंबी होण्यासाठी पावलोपावली मदत केली.त्याचबरोबर सहकार्याची अभूतपूर्व क्रांती घडविली.त्यांनी स्वतः विक्रीसाठी ग्रुपच्या माध्यमातून मुंबईत येणाऱ्या नवख्या शेतकऱ्यांना ग्राहकांनी सन्मानपूर्वक वागणूक देण्यासाठी नियोजन केले.तसेच संवाद साधण्यास मदत केली. प्रसंगी शेतकर्‍यांची राहण्याची, जेवण्याची,गाडी लावण्याची सोय केली आणी ग्रामीण शेतकरी व शहरी ग्राहक यांच्यातील दुवा बनण्याचे काम त्यांनी केले.

त्यांच्या या संकल्पनेवर आधारीत पुढे जाऊन “शेतकरी ते थेट ग्राहक विक्री” हि राज्यशासनाची संकल्पना पुढे आली

कृषी अधिकारी म्हणून काम करताना केवळ नोकरी म्हणून मी न पाहता शेतकऱ्यांचे हित कसे साधता येईल हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून मी काम केले आहे. यापुढेही अजून शेतकऱ्यांच्या हितासाठी मी प्रयत्न करणार आहे. तसेच शेतकरी ते थेट ग्राहक ही लाॅक डाऊन काळात सुरु केलेली चळवळ अजून व्यापक कशी करता येणार यासाठी मी प्रयत्न करणार आहे. हा पुरस्कार म्हणजे माझ्या कामाला मिळालेले प्रोत्साहन समजून मी आणखीन जास्त काम करण्याचा प्रयत्न करणार आहे.

क्रांती चौधरी मोरे

तत्कालीन उरण तालुका कृषी

आधीकारी

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.