Press "Enter" to skip to content

रायगडावर उत्खननात सापडत आहेत सोन्याच्या वस्तू

जगदीश्वर मंदीरा शेजारी असलेल्या एका वाड्याच्या उत्खननामध्ये सापडल्या या अनमोल वस्तू

रायगड किल्ल्यावर उत्खननात 350 वर्षानंतर आढळणाऱ्या पुरातन वस्तू या देशाचा ऐतिहासिक व अनमोल ठेवा :- खा.सुनिल तटकरे

सिटी बेल । रायगड । धम्मशील सावंत ।

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या ऐतिहासिक किल्ले रायगडावर उत्खननात 350 वर्षानंतर आढळणाऱ्या पुरातन वस्तू या देशाचा ऐतिहासिक व अनमोल ठेवा असल्याचे प्रतिपादन खासदार सुनिल तटकरे यांनी केले. यासंदर्भात पत्रकारांशी संवाद साधला यावेळी खा. तटकरे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली.

खा. तटकरे पुढे म्हणाले की, रायगड विकास प्राधिकरण आणि भारतीय पुरातत्व विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने किल्ले रायगडावर उत्खनन सुरू आहे. रायगड विकास प्राधिकरण मार्फत किल्ल्याचे पुनर्स्थापित करण्याचे काम सुरू आहे. या खोदकामादरम्यान दागदागिने सापडत आहेत.रायगड किल्ल्यावर सुरु असलेल्या उत्खनन कामात एक सोन्याची बांगडी आणि निरंजन सापडले आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात साबुत स्थितीत सापडलेला स्त्रीयांचा हा पहिला अलंकार आहे. जगदीश्वर मंदीरा शेजारी असलेल्या एका वाड्याच्या उत्खननामध्ये या वस्तु सापडल्या आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांनी ऐतिहासिक स्वरूपाचा लढा उभा केला होता. याठिकाणी होणाऱ्या उत्खननात भविष्याच्या काळात अनेक प्रकारच्या नाविन्यपूर्ण गोष्टी आढळू शकतील. रायगड किल्ल्यावर आढळणाऱ्या पुरातन वस्तू या देश व जगभरातील शिवप्रेमी नागरिकांसाठी अनमोल ठेवा असणार आहे. असे तटकरे म्हणाले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.