Press "Enter" to skip to content

कोरोना इफेक्ट : राज्यात विकेंडला कडक लाॅकडाऊन

९ एप्रिलपासून शुक्रवारी रात्री ८ वाजता हा लॉकडाऊन सुरु होईल आणि सोमवारी सकाळी हा लॉकडाऊन संपेल

वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारचे कडक निर्बंध

राज्यात गार्डन, सिनेमाघरे, दुकाने, हॉटेल बंद !

सिटी बेल । मुंबई ।

राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली घेतली गेली. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वनेत्यांनी एकमताने काही राज्यात कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी महाराष्ट्रात कडक निर्बंध लागू केले असल्याची माहिती दिली आहे.

यामध्ये धार्मिक स्थळांवर ठराविक लोकांना परवानगी असेल, राज्यात गार्डन, सिनेमाघरे, दुकाने,हॉटेल बंद असतील तर ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असेल तेथील लॉकडाऊन बाबत निर्णय स्थानिक प्रशासन घेईल असे मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी म्हटले आहे.

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी राज्य मंत्रिमडळात झालेल्या निर्णयाची माहिती दिली. राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यामध्ये सर्वप्रथम धार्मिक स्थळे, मंदिर,मस्जिद, गुरुद्वारामध्ये पुर्वी जशी ठराविक लोकांना परवानगी देण्यात आली होती. त्याप्रमाणेच परवानगी असेल, सिनेमा घर आणि नाट्यगृह बंद असेल गार्डन बंद करण्यात येणार आहे. संचारबंदी करण्यात येईल यावेळी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना सूट देण्यात आली आहे. रेस्टॉरंट बंद असून टेक अवे सुविधेला परवानगी असेल, उद्योगांच्या वेळा निश्चित केल्या जातील उद्योग किंवा कंपनीत एखादा कर्मचारी कोरोनाबाधित झाल्यास त्याची जबाबदारी सर्वस्वी कंपनीची असेल. बेकरी, मेडिकल सुरु राहणार, वर्क फ्रॉम होमला परवानगी, फिल्म शूटींग मोठ्या स्वरुपाच्या बंद करण्यात आल्या आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी नाही, सार्वजनिक वाहतूक सुरु राहणार असून रिक्षामध्ये फक्त दोन प्रवाशांना परवानगी असेल. शनिवार आणि रविवार संपूर्ण लॉकडाऊन असेल अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे.

विकेंडला राज्यात कडक लॉकडाऊन राहिल – नवाब मलिक

शुक्रवारी रात्री ८ वाजता म्हणजे ९ एप्रिलपासून हा लॉकडाऊन सुरु होईल आणि सोमवारी सकाळी हा लॉकडाऊन संपेल असा निर्णय झाला आहे. यानिर्णयामुळे कोणतेही राजकीय कार्यक्रम घेता येणार नाही. तसेच धार्मिक स्थळेही पूर्णपणे बंद राहणार आहेत. मात्र विविध धर्माच्या पुजारी, ट्रस्टी आणि धर्मगुरुंना त्यांच्या धर्मानुसार विधी पार पाडण्याची मुभा देण्यात आल्या होत्या त्या मुभा असणार आहे.

या राज्यामध्ये कोरोना गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याने मुख्यमंत्र्यांनी मीडियातील मुख्य लोकांशी संवाद साधला. तसेच इंडस्ट्रीतील मुख्य लोकांबरोबर फिल्म इंडस्ट्रीमधील मुख्य लोकांशी संवाद साधला. तसेच विरोधी पक्षनेत्यांशीही यावर चर्चा करण्यात आली. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंशी पण मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. याचा हेतू एकचं आहे की, कोरोना विषाणूशी लढत असतानाच संपूर्ण राज्यात एकजूट दिसली पाहिजे. आणि निश्चित रुपाने आम्हाला अपेक्षा आहे. ज्याप्रमाणे कोरोना आकडेवारी वाढत आहे. ५० हजार पेक्षा जास्त रुग्ण आढळत आहे. याच गतीने रुग्ण वाढत राहिले तर आरोग्य सेवेत कमतरता भासेल ही वस्तूस्थिती आहे. त्यासाठी ही बैठक झाली. या बैठकीत कडक नियमावली तयार करण्यात आली. तसेच या विकेंडला राज्यात कडक लॉकडाऊन राहिल.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.