Press "Enter" to skip to content

सर्वपक्षीय प्रकल्पग्रस्त संघटनेचा सिडको मास हाऊसिंग ला जोरदार विरोध

दि.बा पाटील सर्व पक्षीय संघटनेचे नेते संतप्त : संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली संघर्षाचा एल्गार

सिटी बेल लाइव्ह / पनवेल / स्पेशल रिपोर्ट #

खारकोपर, कामोठे, बामणोंगरी व तळोजा येथील रेल्वेस्टेशन समोरील नियोजीत पार्किग जागा व मैदानावर सिडकोने जबरदस्तीने प्रतप्रधान आवास योजना राबविण्याचे कटकारस्थाना मुळे संतप्त झालेल्या दि.बा पाटील सर्व पक्षीय संघटनेच्या नेत्यांनी, संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली प्रखर विरोध केला.

सोमवार दि. २ जुलै २०२० रोजी साय ५.०० वाजता रामशेठ ठाकूर स्पोट्स कॉम्प्लेक्स मध्ये सर्वपक्षीय संघटनेचे नेते, कार्यकर्त व सिडकोचे अधिकारी यांची संयुक्त बैठक बोलाविण्यात आली होती. यावेळी माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार बाळाराम पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, संघटनेचे उपाध्यक्ष बबनदादा पाटील यांनी आमचा मास हाऊसिंग ला विरोध नाही मात्र सिडको संपादित शेकडो हेकटर जमीन बाजूला पडीक असताना, २१ व्या शतकातील सुंदर शहराचे स्वप्न दाखविण्या-या सिडको प्रशासनाने आधीच्या नियोजनाचा खून करून पार्किंग व मैदानांच्या जागावर मास हाऊसिंगच्या शेकडो इमारती उभारण्याच्या प्रयत्न करून सुंदर शहराची धारावी झोपडपट्टी करण्याचा चंग बांधला आहे. आधीच शहरे उभारताना दाखयलेली नागरी सुविधाचा स्वप्ने कागदावर राहिलेली आहेत. अपुरा पाणीपुरवठा, दोन लाख लोकसंख्या उलवे नोड मध्ये येऊन सुद्धा १० वर्षात एकही स्मशान भूमी व दफनभूमी नाही. बगीचे इतर सुविधा पुरवण्यात आलेले अपयश आणि त्यात अजून हजारो घरे उभारण्याचा मूर्खपणा याला आमचा विरोध आहे, गेली ३० वर्षे प्रकल्पग्रस्त गावांसाठी नागरी सुविधांवर एकूण उलाढालीच्या ५% खर्च करण्याचे आश्वासन हवेतच विरलेले आहे. या व अनेक गोष्टीमुळे संतप्त झालेल्या स्थानिक प्रकल्पग्रस्त व उलवे, कामोठे, तळोजे नोड मधील रहिवाश्यांनी प्रचंड संताप व्यक्त करून सिडको मास हाऊसिंगचे कामबंद पाडले आहे व कुठल्याही परिस्थितीत प्रकल्पाची जागा न बदल्यास प्रकल्प होऊ देणार नाही असा सज्जड दम देण्यात आला.

या वेळी दि.बा.पाटील संघर्ष समितीच्या वतीने माजी खासदार रामशेठ ठाकूर, बबनदादा पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार बाळाराम पाटील, मा.आमदार मनोहर भोईर, महेंद्र घरत, अरुणशेठ भगत, रवीशेठ पाटील, राजन पाटील, रत्प्रभा घरत, तर सिडकोच्या वतीने नवी मुंबई विमानतळाचे मुख्य अभियंता श्री डायटकर, उलवे नोड मुख्य अभियंता श्री. गोडबोले, मुख्य नियोजनकर श्री मानकर, कार्यकारी अभियंता श्री रामोड व इतर अधिकारी उपस्थित होते व प्रकल्पस्त गावातील कार्यकर्त उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.