Press "Enter" to skip to content

भारताचे पहिले बंदर आधारित विशेष आर्थिक क्षेत्र (पोर्ट बेस्ड सेझ एसईझेड) जेएनपीटी सेझ सुरू

जेएनपीटी सेझ मध्ये ५ कंपन्यांनी सुरू केले बांधकाम : २ कंपन्यांनी सेझमध्ये यशस्वीरित्या सुरू केले कार्य

सर्व तीन कंपन्यांना विकास आयुक्त, सिप्झ (एसईईपीझेड), एसईझेड यांनी कार्य सुरू करण्यास दिली मंजूरी

सिटी बेल लाइव्ह / उरण(घन:श्याम कडू)

जेएनपीटी हे भारताचे प्रमुख कंटेनर पोर्ट आहे. जेएनपीटी नवी मुंबई येथे आपल्या मालकीच्या 277 हेक्टर क्षेत्रामध्ये बहु उत्पादन विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) विकसित करत आहे. नौवहन मंत्रालयाच्या सागरमाला उपक्रमांतर्गत बंदर आधारित औद्योगीकरण सक्षम करून निर्यातीला चालना देण्याच्या उद्देशाने या बहु-उत्पादन बंदर आधारित सेझचा विकास केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑगस्ट २०१४ मध्ये या प्रकल्पाची पायाभरणी केली होती.
अशाप्रकारच्या बंदर आधारित सेझचा विकास करणारे जेएनपीटीने हे देशातील पहिले बंदर ठरले आहे. जेएनपीटी सेझमधील दोन कंपन्यां, मेसर्स ओडब्ल्यूएस एलएलपी आणि मेसर्स क्रिश फूड इंडस्ट्री (इंडिया) यांनी आपल्या पहिल्या टप्प्यातील कार्य पूर्ण केले आहे व विकास आयुक्त, सिप्झ (एसईईपीझेड), एसईझेड यांनी या कंपन्यांना कार्य सुरू झाल्याचे घोषित केले आहे. कोविड -१९ च्या आव्हानात्मक काळात या कंपन्यांनी केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. पहिल्या २ कंपन्यांव्यतिरिक्त आणखी ३ कंपन्या लवकरच त्यांचे बांधकाम कार्य सुरू करण्याची शक्यता आहे.
एसईझेडच्या प्रगतीबद्दल बोलताना जे.एन.पी.टी. चे अध्यक्ष श्री.संजय सेठी, भा.प्र.से. म्हणाले की, “जेएनपीटी साठी अत्यंत गौरवशाली असा हा क्षण आहे कारण बंदर आधारित विशेष आर्थिक क्षेत्र यशस्वीरित्या विकसित करणारे जेएनपीटी हे देशातील पहिले बंदर ठरले आहे. या सेझमध्ये आम्ही पायाभूत सुविधांचा विकास आंतरराष्ट्रीय मानदंडानुसार करीत आहोत त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की भारताला मॅन्युफॅक्चरिंग हब बनविण्यासाठी जगातील नामांकित कंपन्या येथे मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करतील . संभाव्य गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीमुळे जेएनपीटी परिसरातील संपूर्ण इको सिस्टमला चालना मिळेल. भारतातील पहिल्या बंदर आधारित बहु उत्पादन एसईझेड विकसित आणि कार्यान्वित करण्यासाठी वेळेवर सहकार्य व मार्गदर्शन केल्याबद्दल सिप्झ (एसईईपीझेड) चे विकास आयुक्त, भारत सरकारचे वाणिज्य मंत्रालय यांचा मी आभारी आहे आणि हे सर्व शक्य होण्यासाठी वेळेवर केलेल्या सहकार्याबद्दल मी सर्व भागधारकांचे सुद्धा आभार मानतो. ”
आजपर्यंत एकूण १९ एमएसएमई आणि १ मुक्त व्यापार वेअरहाउसिंग झोन (एफटीडब्ल्यूझेड) सह- विकसकांना जेएनपीटी सेझमध्ये भूखंड देण्यात आले आहेत. आम्हाला अपेक्षा आहे की उर्वरित सर्व युनिट सुद्धा नजीक भविष्यात याचे अनुसरण करतील आणि कार्यान्वित होतील. गेल्या काही महिन्यांपासून जेएनपीटी सेझच्या यशस्वी परिचालनासाठी सतत काम करत आहे. जेएनपीटी-सेझचे कार्य पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर यामध्ये ४००० कोटी रुपयांची गुंतवणूक आणि ५७००० रोजगार निर्मिती अपेक्षित आहे.
सेझमधील कंपन्यांना जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जेएनपीटी कोणतीही कसर सोडत नाही. या एसईझेड प्रकल्पासाठी जेएनपीटीला विशेष योजना प्राधिकरण (एसपीए) दर्जा प्राप्त झाला आहे. तसेच महाराष्ट्र सरकारच्या एमईआरसी विभागकडून जेएनपीटी सेझला वीज वितरण परवाना सुद्धादेण्यात आला आहे. सेझच्या उभारणीसाठी सर्व प्रकारच्या परवानग्या आपल्या प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे जेएनपीटी सेझमध्ये कंपन्यांना आपले युनिट्स सुरू करण्यासाठी लागणारा वेळ आणि पैसा यांची बचत होण्यास मदत होईल आणि “इझी ऑफ़ डूइंग बिझिनेस” वाढेल.

जेएनपीटी विषयी :
जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) हा नवी मुंबई येथील भारतातील सर्वात मोठे कंटेनर हाताळणीचे बंदर आहे. भारतातील मुख्य बंदरांमध्ये होणाऱ्या एकंदर कंटेनर कार्गो वाहतुकीच्या सुमारे ५२% कामकाज जेएनपीटी येथे चालते. २६ मे १९८९ मध्ये या बंदराची स्थापना झाली असून कामकाजाच्या तीनपेक्षा कमी दशकांत जेएनपीटी हे देशातील बल्क-कार्गो टर्मिनलवरून प्रीमियर कंटेनर पोर्ट म्हणून नावारूपाला आले. जगातील १०० कंटेनर पोर्टमध्ये जेएनपीटी २८ व्या स्थानावर असून ते जगातील २०० हून अधिक बंदरांना जोडलेले आहे.

सध्या जेएनपीटी येथे पाच कंटेनर टर्मिनल्स कार्यरत आहेत. ज्यामध्ये जवाहरलाल नेहरू पोर्ट कंटेनर टर्मिनल (जेएनपीसीटी), न्हावा शेवा इंटरनॅशनल कंटेनर टर्मिनल (एनएसआयसीटी), गेटवे टर्मिनल्स इंडिया प्रा. लि. (जीटीआयपीएल), न्हावा शेवा इंटरनॅशनल गेटवे टर्मिनल (एनएसआयजीटी) आणि नव्याने स्थापन करण्यात आलेल्या भारत मुंबई कंटेनर टर्मिनल्स प्रायव्हेट लिमिटेड (बीएमसीटीपीएल)चा समावेश आहे. या बंदरात सर्वसाधारण कार्गोकरिता शॅलो वॉटर बर्थ आणि आणखी एक लिक्विड कार्गो टर्मिनल आहे, ज्याचे व्यवस्थापन बीपीसीएल-आयओसीएल कन्सोर्टीयमद्वारे चालते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.