वाचा काय काय उद्योग केलेत या एनकाऊंटर स्पेशालिस्ट ने
सिटी बेल लाइव्ह । मुंबई ।
पूर्वी ‘वागळे की दुनिया’ नावाची एक सीरियल टिव्हीवर होती. त्यातून वागळेचं जग दाखवण्यात आलं होतं. या सीरियलने अनेकांना खिळवून ठेवलं होतं. सध्या ‘वाझेंची दुनिया’ हा एक चर्चेचा विषय ठरला आहे. वाझेंच्या वादग्रस्त दुनियेनंतर आता त्यांची रहस्यमयी दुनिया समोर आल्याने अनेकजण चक्रावून गेले आहेत. एक माणूस एवढया गोष्टी करू शकतो का? असं वाटणाऱ्या या सर्व अनाकलनीय गोष्टी आहेत.एन्काऊंटर स्पेशालिस्टपासून ते सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म सुरू करण्याचे कारनामे वाझेंनी केले आहेत. त्यांनी व्हॉट्सअॅप सारखं स्वदेशी मेसेंजिग अॅप सुद्धा सुरू केलं होतं.
एवढेच नव्हे तर त्यांनी दोन पुस्तकेही लिहिली आहेत. त्यांच्या नावावर सहा ट्रेडमार्क नोंदणीकृत होते. कॉपीराईट केल्याप्रकरणी तर त्यांनी बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा विरोधात खटलाही भरला होता. पोलीस दलातून निलंबित झाल्यानंतर त्यांनी मुंबईत पोलिसात येण्यापूर्वी औद्योगिक, एन्क्रिप्टेड सामग्री, सोशल मीडिया, सायबर स्पेसच्या दुनियेत एन्ट्री केली होती.
वाझेंचा मॅसेजिंग अॅप
ख्वाजा युनूस प्रकरणात निलंबित होण्याआधी वाझेंनी साबर क्राईम, बँक कार्ड आणि फसणूक अशा टेक्निकलबाबींशी संबंधित विभागात काम केलं. निलंबनानंतर त्यांनी प्राद्योगिक प्लॅटफॉर्म आणि आणि उत्पादने बनिवण्याच्या तंत्रासह सायबर कौशल्य आणि अनुभवाचा उपयोग केला. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी ‘डायरेक्ट बात’ नावाचा मेसेंजिग अॅप तयार केला. व्हॅट्सअॅपच्या धर्तीवर हा अॅप तयार करण्यात आला होता. उद्योगपती, सरकारी एजन्सी आणि हायप्रोफाईल लोकांसाठी हा अॅप डिझाईन करण्यात आला होता. वाझेंनी ही पेड सर्व्हिस सुरू केली. पृथ्वीवरील सर्वात सुरक्षित अॅप असल्याचा त्यांनी दावा केला होता. त्यांनी 2018मध्ये हा अॅप तयार केला होता. एन्क्रिप्टेड कम्युनिकेशन प्लॅटफॉर्म, संदेश पाठवणे, व्हिडीओ कॉलिंग आणि फाईल शेअर करणं आदी गोष्टी या अॅपद्वारे करण्यात येत होत्या. संयोश शेलार यांच्या सहकार्याने त्यांनी हे अॅप तयार केलं होतं. दरम्यान, आता या अॅपची लिंक गुगलवर नाही. हे अॅप गुगल प्ले स्टोअरवरून हटवण्यात आलं आहे.
वाझेंचं सर्च इंजिन
वाझेंनी भारत केंद्रीत लोकांच्या माहितीसाठी सर्च इंजिन तयार केलं होतं. या सर्च इंजिनद्वारे मोफत आणि पेड सर्व्हिस देण्यात आली होती. 2012मध्ये हे सर्च इंजिन लॉन्च करण्यात आलं होतं. Indianpeopledirectory.com नावाने हे सर्च इंजिन तयार करण्यात आलं होतं. नाव, पत्ता, संपर्क आणि पार्श्वभूमी शोधण्यात हे सर्च इंजिन उपयोगी असल्याचा दावा करण्यात आला होता.
फेसबूकचं मराठी व्हर्जन
फेसबुक कंपनीने 2006मध्ये फेसबुक सुरू केलं होतं. वाझेंनाही फेसबूकचं मराठी व्हर्जन असावं असं वाटत होतं. त्यांनी मराठी भाषिकांसाठी स्थानिक सोशल नेटवर्क प्लॅटफॉर्म सुरू केलं होतं. 2010मध्ये वाझेंनी ‘मराठी फेसबुक’ तयार केलं होतं. या फेसबुकवर येण्यासाठी त्यांनी मराठी तरुणांना आवाहनही केलं होतं. या फेसबुकवर असंख्य फोटो अपलोड करण्याची सुविधा, पोस्ट लिंक आणि व्हिडीओ अपलोड करण्याची सुविधाही देण्यात आली होती.
वाझेंनी कायदा, सुरक्षा, कॉम्प्युटर हार्डवेअर आणि सोशल नेटवर्किंगशी संबंधित सेवांसाठी आपल्या नावाविरोधात सहा ट्रेडमार्क दावे केले होते. वाझेंनी तयार केलेल्या ट्रेडमार्कमध्ये ‘LAPCOP’, ‘KNOW YOUR LAW’, ‘A Fascinating Side of Life’ आणि ‘LAI BHAARI’ आदींचा समावेश होता. आपल्या ट्रेडमार्कचा फायदा उचलताना त्यांनी एकदा तर रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा यांच्याविरोधात खटला दाकल केला होता. 2014मध्ये लयभारी नावाचा रितेशचा सिनेमा आला होता. या सिनेमासाठी आपल्या ट्रेडमार्कचा वापर केल्याचा दावा वाझेंनी केला होता.
दोन पुस्तके लिहिली
वाझे केवळ तंत्राच्या दुनियेतच रमले नाहीत तर त्यांनी दोन पुस्तकेही लिहिली. मुंबईवरील हल्ल्यावरील ‘जिंकून हरलेली लढाई’ हे पुस्तक त्यांनी 2012मध्ये प्रकाशित करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी माजी पोलीस अधिकारी शिरीष थोरात यांच्या सहकार्याने ‘द स्काऊट’ नावाचं पुस्तक लिहिलं. 2019मध्ये हे पुस्तक प्रकाशित झालं होतं. या इंग्रजी पुस्तकात अतिरेकी हल्ल्यावर भाष्य करण्यात आलं होतं.
Be First to Comment