Press "Enter" to skip to content

कोरोनाकाळात पीठाचे वितरण केलेल्या महिलांचे कार्य उल्लेखनीय

जून महिन्यापासून मुंबईतील ६० महिला सांभाळत आहेत पीठाची वितरण व्यवस्था

सिटी बेल लाइव्ह । मुंबई ।

जगभरात आरोग्यसेवा असो की सामाजिक सेवा क्षेत्र यामध्ये काम करणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण ७० टक्के आहे, प्राचीन काळापासूनच स्त्री ही कधीही अबला नव्हतीच याउलट काळाच्या ओघात तिची कला, जिद्द व प्रतिकूल परिस्थितीशी सामना करण्याची क्षमता अजून वाढतच गेली आहे. ज्या – ज्या वेळी तिच्यावर जबाबदारी टाकली गेली त्यावेळी तिने सक्षमपणे ती  जबाबदारी स्वीकारून आपले वेगळेपण सिद्ध केले आहे.

जागतिक महिला दिनानिमित्त ८ मार्च ते १५ मार्च ह्या आठवडयात  कर्तृत्त्ववान महिलांचा गौरव केला जातो परंतु अनेकवेळा उत्तुंग कामगिरी  करूनही अनेक महिलांचे कर्तृत्व दुर्लक्षित राहते. कोरोनाच्या महामारीमध्ये महिला डॉक्टर, परिचारिका, महिला कंडक्टर, सफाई कर्मचारी, अबोली रिक्षाचालक यासोबतच जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करणाऱ्या महिलांनी सुद्धा समाजाची सेवा करून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

किचनमध्ये रोज वापरात येणाऱ्या एखाद्या छोट्याशा वस्तूची कमतरता जाणविल्यानंतर त्या वस्तूची खरी किंमत आपल्याला कळते, आपल्या सर्वांच्या किचनमध्ये आढळणारा पदार्थ म्हणजे ” पीठ ” -चपात्या , भाकऱ्या व इतर पदार्थ बनविण्यासाठी गहू, तांदूळ, ज्वारी , बाजरी, चणा नाचणीचे पीठ प्रत्येक घरामध्ये आढळते परंतु कोरोना संक्रमणाच्या काळात विशेषतः  मे ते ऑक्टोबर २०२० दरम्यान हे पीठ मिळणे फारच दुर्लभ झाले होते, कारण मुंबईच्या गल्लीबोळात असणाऱ्या पिठाच्या गिरण्या बंद होत्या तसेच कर्फ्यू असल्याने नागरिकांना बाहेर पडण्यास मज्जाव होता व याच काळात विलेपार्ले येथील टेस्ट फॉर लाईफ या कंपनीच्या ६० महिलांनी मुंबईच्या दुकानांमध्ये तयार पिठाचा साठा कमी होऊ दिला नाही.

टेस्ट फॉर लाईफ ही कंपनी रेडीमेड आटा बनविण्यासाठी प्रसिद्ध असून मुंबई -ठाणे , नवी मुंबई येथील एक हजारांहून अधिक  दुकानांमध्ये जून महिन्यापासून न थांबता पीठाचे वितरण सुरु ठेवले. कोरोना काळामध्ये आमच्या फॅक्टरीत  काम करणाऱ्या कामगारांना राहण्याची सुविधा दिल्यामुळे दिवसरात्र आम्ही पिठाचा साठा वितरीत करू शकलो, तसेच अनेक रहिवासी सोसायट्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळल्यामुळे नागरिकांना बाहेर पडण्याची अनुमती नव्हती परंतु आमच्या महिला स्टाफने अशा सोसायट्यांमध्ये जाऊन धान्य व  पीठाचे वितरण करीत होत्या अशी माहिती कंपनीच्या सेल्स व वितरण प्रमुख श्रीमती मीनल देशपांडे यांनी दिली.

त्या पुढे म्हणाल्या, जून महिन्यापासून आपल्या जीवाची पर्वा ना करता मुंबईतील एक हजारहून अधिक दुकानात पिठाच्या वितरण व्यवस्था या महिलांनी सांभाळली. आमच्या सेल्स विभागात ६० हुन अधिक महिला काम करीत असून या कोरोनाकाळातील त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. कोव्हिड-१९ने आपल्या सर्वानाच अक्षरश: हादरवून सोडले आहे. या महामारीच्या उद्रेकामुळे जगभरातील पुरवठा साखळीत व्यत्यय निर्माण झाला होता व त्यामध्ये प्रामुख्याने अन्न धान्याचा समावेश होता परंतु या कठीण परिस्थीतीवर मात करून टेस्ट फॉर लाईफ या कंपनीच्या स्त्री शक्तीने ही परिस्थिती फारच कुशलतेने हाताळली जून महिन्यापासून एकही दिवस विश्रांती न घेता जेवणामध्ये रोज लागणाऱ्या पिठाचा पुरवठा अविरत करीत आहेत. या महिलांमध्ये वयाच्या तिशीपासून ते साठी पार केलेल्या महिला असून कंपनीतर्फे त्यांची वेळोवेळी शारीरिक तपासणी केली जाते. महिला दिनानिमित्त आम्ही या सर्व महिलांचा सत्कार केला असून येत्या काळात या महिलांना आम्ही विविध पुरस्कारांनी सन्मानित करणार आहोत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.