Press "Enter" to skip to content

उमरठ येथे नरवीर तानाजी मालुसरे यांच्या शौर्यदिनी हळदीकुंकू सोहळा

आज पालकमंत्री ना. अदिती तटकरे, खा.तटकरे व खा.श्रीकांत शिंदे व मान्यवर येणार

सिटी बेल लाइव्ह । पोलादपूर । शैलेश पालकर ।

तालुक्यातील उमरठ येथील सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांच्या 351 व्या शौर्यदिनी आयोजित कार्यक्रमामध्ये आज शनिवारी दुपारी तालुक्यातील असंख्य महिलाभगिनींनी सौभाग्याचे वाण लुटून हळदीकुंकू सोहळा यशस्वी केला. आज रविवारी कल्याण येथील खासदार श्रीकांत शिंदे यांना सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे पुरस्कार 2021 प्रदान करण्यात येणार असून पालकमंत्री ना. अदिती तटकरे, खा.सुनील तटकरे आ.भरत गोगावले तसेच अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती उत्सव समितीचे अध्यक्ष राजिप सदस्य चंद्रकांत कळंबे यांनी दिली.

पालकमंत्री ना.अदिती तटकरे,खा.सुनील तटकरे, खा.श्रीकांत शिंदे, राजिप अध्यक्षा योगिता पारधी, उपाध्यक्ष सुधाकर घारे, आ.भरत गोगावले, माजी आ.पंडीतशेठ पाटील, मनोहर भोईर, माणिकराव जगताप, जिल्हाधिकारी निधी चौधरी, राजिप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, पोलादपूर पं.स.सभापती नंदा चांदे, उपसभापती शैलेश सलागरे, तहसिलदार दिप्ती देसाई तसेच रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सदस्य व पदाधिकारी रविवारी नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.

रविवारी सकाळी नरवीर तानाजी मालुसरे आणि शेलारमामा यांच्या समाधीला किरण महाराज कळंबे आणि संजय महाराज कुलकर्णी यांच्याहस्ते महाभिषेक झाल्यानंतर उत्सव समितीचे अध्यक्ष राजिप सदस्य चंद्रकांत कळंबे व युवासेना अध्यक्ष संजय कळंबे यांच्याहस्ते पुजाविधी तसेच कृष्णा कळंबे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. नरवीरांच्या समाधीला महादेवमहाराज कळंबे यांच्याहस्ते तर शेलारमामांच्या समाधीला नामदेव कळंबे यांच्याहस्ते पुष्पचक्र प्रदान करण्यात येईल. यानंतर नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येऊन नरवीरांच्या पालखीची सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.

यानंतर रायगडभूषण शिवशाहिर वैभव घरत व सहकारी यांचा शाहिरी पोवाडयांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमावेळी नरवीर तानाजी मालुसरे यांचे वंशज रायबा मालुसरे यांच्या मातोश्री डॉ.शीतल मालुसरे यांच्या नरवीर तान्हाजी मालुसरे यांची शौर्यगाथा या पुस्तकाचे प्रकाशन कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्याहस्ते करण्यात येणार आहे. सायंकाळी मशाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून रात्री शिरूर येथील श्रीरांजणगांव महागणपती ज्युनियर कॉलेजचे प्रा. शिवव्याख्याते नवनाथ महाराज माशेरे यांचे हरिकिर्तन आयोजित करण्यात आले आहे.
शनिवारी सकाळी नरवीरांच्या पुतळयाचे पुजन सखाराम कळंबे व ध्वजारोहण आनंदा कळंबे यांच्याहस्ते करण्यात आले. सकाळी 10 वाजता नरवीरांच्या पुतळयास अध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी युवासेना अध्यक्ष संजय कळंबे, लक्ष्मण मोरे, सुरेश पवार, गायकवाड, सरपंच चंद्रकांत कळंबे, सखाराम कळंबे, जयराम मोरे, सीताराम कळंबे आदी मान्यवर उपस्थित होते. महिला सक्षमीकरण मेळाव्यांतर्गत हळदीकुंकू समारंभ सुहासिनींच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला. सायंकाळी गणेश महाराज कळंबे यांचा संगीत भजनाचा कार्यक्रम तसेच प्राथमिक व उच्च माध्यमिक विद्यालय उमरठच्या विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला. यानंतर रात्री महाप्रसादाचे झाल्यावर बहुचर्चित हिंदी चित्रपट ‘तान्हाजी द अनसंग वॉरीयर’ मोठया पडद्यावर दाखविण्यात आला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.