Press "Enter" to skip to content

अश्वत्थामा

अश्वत्थामा

अस्वस्थ मी
नि:शब्द मी
उसासे सोडतो
घुसमटून मी…….
एकटाच मी
एकांतात मी
गर्दी भोवताली
वनवासात मी……
न भास कोणाचा
न श्वास कोणाचा
न सोबतीला
हात कोणाचा……..
सुखाच्या सरीच्या
शोधात मी केविलवाणा
हितगुज करण्या
शोधतो बहाणा……..
कोण मी आहे
शोधतो अंतरात्मा
प्रत्येकात लपलेला
मी अश्वत्थामा………..

मयुरेश आडकर, वांगणी, बदलापूर

3 Comments

  1. मनिषा कुलकर्णी मनिषा कुलकर्णी March 5, 2021

    अतिशय सुंदर कविता अश्वत्थामा.. प्रत्येकात लपलेल्या अश्वत्थामा ला सुंदर शब्दात गुंफल्या आहेत… कवी मयुरेश आडकर यांचे खूप अभिनंदन… आणि अजून कविता वाचायला आवडतील.. त्यासाठी शुभेच्छा

  2. मनिषा कुलकर्णी मनिषा कुलकर्णी March 5, 2021

    अतिशय सुंदर कविता अश्वत्थामा.. प्रत्येकात लपलेल्या अश्वत्थामा ला सुंदर शब्दात गुंफले आहे… कवी मयुरेश आडकर यांचे खूप अभिनंदन… आणि अजून कविता वाचायला आवडतील.. त्यासाठी शुभेच्छा

  3. मनिषा कुलकर्णी मनिषा कुलकर्णी March 5, 2021

    अतिशय सुंदर कविता अश्वत्थामा.. प्रत्येकात लपलेल्या अश्वत्थामा ला सुंदर शब्दात गुंफले आहे.. कवी मयुरेश आडकर यांचे खूप अभिनंदन.. अजून कविता वाचायला आवडतील.. यासाठी खूप शुभेच्छा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.