Press "Enter" to skip to content

कविता दिवेकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम ।

रायगड जिल्ह्यातील महाड येथील किशोर दिवेकर यांची पत्नी कविता किशोर दिवेकर यांचे त्यांच्या राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.मृत्यू समयी त्यांचे वय ५४ वर्षाचे होते.

त्या अतिशय प्रेमळ व परोपकारी स्वभावाने सर्वांना परिचित होत्या. त्यांच्या मृत्यूची वार्ता समजताच त्यांच्या अंत्यदर्शनासाठी सामाजिक, शैक्षणिक,व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थितीत होते.त्यांच्या पार्थिवावर महाड येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांच्या पश्चात पती किशोर दिवेकर, वैभव व कल्पेश या दोन मुलांसह सूना व नातवंडे असा परिवार आहे.त्यांचे दशक्रिया विधी बुधवार दि.१० मार्च व उत्तर कार्य विधी शुक्रवार दि १२ मार्च २०२१ रोजी त्यांच्या राहत्या निवास्थानी होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.