Press "Enter" to skip to content

श्रेया दळवी ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत रायगड जिल्ह्यात प्रथम

सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम ।

रोहा तालुक्यातील द. ग. तटकरे जुनिअर कॉलेज कोलाड येथे कै. शिक्षण महर्षी दादासाहेब लिमये यांच्या स्मुती पित्यार्थ घेण्यात आलेल्या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत द. ग. तटकरे जुनिअर कॉलेजची विद्यार्थी श्रेया सुनिल दळवी संपूर्ण रायगड जिल्ह्यात प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली आहे.तर को. ए. सो. नागोठणे येथील सानिया संजय रणदिवे दुसरी, तर एन. एन. पालीवाला ज्यु. कॉलेज पनवेल येथील वैष्णवी श्रीकांत म्हात्रे तिसरी क्रमांकाची मानकरी ठरली आहे.

कै. शिक्षण महर्षी दादासाहेब लिमये यांच्या स्मुती पित्यार्थ घेण्यात आलेल्या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत प्रथम आलेली श्रेया सुनिल दळवी ही कै. द. ग. तटकरे ज्यु. कॉलेज कोलाड येथील असुन ती पुई येथील सामाजिक कार्यकर्ते गंगाराम दळवी यांची नात आहे.तसेच कॉलेजचे प्राचार्य शिरीष येरुणकर व कॉलेजचे सर्व शिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली कॉलेजचे विद्यार्थी शिक्षण,कला क्रीडा क्षेत्रात भरारी घेतांना दिसत आहेत.श्रेया दळवी हिच्या यशा बद्दल सुधागड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष वसंतराव ओसवाल, सौ. गिताताई पारलेचा,द.ग.तटकरे ज्यु. कॉलेज कोलाडचे प्राचार्य शिरीष येरुणकर, व सर्व शिक्षक वर्ग,स्कूल कमेटी अध्यक्ष तथा आंबेवाडी ग्रामपंचायत सरपंच सुरेश महाबळे,यांच्यासह विविध स्थरावरील मान्यवरांनी तिचे अभिनंदन केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.