Press "Enter" to skip to content

कर्जत नगरपरिषदेचा शिल्लकी अर्थसंकल्प सादर

सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड ।

कर्जत नगरपरिषदेचा शिल्लकी 1 कोटी 38 लाख 91 हजार 972 रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात नागरिकांवर कोणताही आर्थिक बोजा नाही, करवाढ करण्यात आली नाही.

कर्जत नगरपरिषदेचा सन 2021-22 चा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी नगरपरीषदेची विशेष सभा ऑनलाइन पद्धतीने नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. यावेळी नगरसेविका भारती पालकर, सुवर्णा निलधे, प्राची डेरवणकर, संचिता पाटील, पुष्पा दगडे, स्वामिनी मांजरे, विशाखा जिनगरे, वैशाली मोरे, नगरसेवक शरद लाड, विवेक दांडेकर, बळवंत घुमरे, राहुल डाळींबकर, उमेश गायकवाड, धनंजय दुर्गे, आणि मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील उपस्थित होते. मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी अर्थसंकल्प नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांच्याकडे सादर केला.

नगराध्यक्षा जोशी यांनी यावर्षीचा 2021-22 करिता अर्थसंकल्पात महत्वकांक्षी प्रकल्पाचा समावेश असल्याने 135 कोटी 10 लाख 52 हजार 972 रुपयांचा अर्थसंकल्प सभागृहात मांडला. कर्जत शहरातील वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी 6 कोटी, नदी संवर्धन प्रकल्पासाठी 10 कोटी, अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत अंतर्गत सोलर पॅनल बसवण्यात कमी 3 कोटी, भुयारी मार्गासाठी 5 कोटी, भुयारी गटार आणि मलनिसा:रण प्रकल्पासाठी 5 कोटी, तसेच स्वच्छतेचे मानांकन राखण्यासाठी आणि त्याचा दर्जा सुधारण्यासाठी 2 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शासनाच्या विविध योजनांसाठी विशेष पाठपुरावा करून त्याचा लाभ लाभार्थींना मिळण्याकरिता विशेष प्रयत्नांसाठी तरतूद करण्यात आली आहे तसेच मागास कमकुवत व गरीब घटकांकरिता त्यांना मूळ प्रवाहात आणण्याकामी करावयाच्या पायाभूत सुविधांसाठी 80 लाखाची तरतूद, दिव्यांगांसाठी 8 लाख तरतूद, सायन्स पार्कसाठी लाखाची तरतूद, अग्निशमन दल साठी साहित्य अद्यावत करण्यासाठी 7 लाख 50 हजार रुपयांची तरतूद, शासनाच्या डिजिटल धोरणा प्रमाणे नागरिकांना घर बसल्या विविध सेवा प्राप्त करता येणार असून घर बसल्या करांचा भरणा करण्यास कामासाठी संगणकीयकरण करता 25 लाख रुपयांची तरतूद, तसेच शहरातील उघडी गटारे बंदिस्त करण्यासाठी आवश्यक ती तरतूद करण्यात आली आहे.

नगरपरिषदेकडे 135 कोटी 10 लाख 52 हजार 972 रुपये जमा होते तर 133 कोटी 71 लाख 61 हजार रुपये खर्च झाले असून नगरपरिषदेचा 1 कोटी 38 लाख 91 हजार 972 रुपयाचा शिल्लकी अर्थसंकल्प सभागृहात लेखापाल जितेंद्रगिरी गोसावी यांनी सभागृहात वाचून दाखविला. अरविंद नातू कार्यालयीन अधिक्षक यांनी इतर कामकाज पाहिले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.